दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला ‘डबल धक्का’, कर्णधार रोहितसह वेगवान गोलंदाजही संघाबाहेर

IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून भारत खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला ‘डबल धक्का’ बसला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) हा देखील स्नायूमध्ये ताण आल्याने मालिकेबाहेर झाला आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट कर ही माहिती दिली आहे.

News Reels

दुसऱ्या कसोटीसाठी कसा आहे भारतीय संघ?

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट

हेही वाचा :  न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत कोहलीची जागा कोण घेणार? 'हे' तिघे आहेत बेस्ट ऑप्शन

कसोटी मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर

भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.

बांगलादेश संघालाही धक्का

बांगलादेशने देखील भारताविरुद्ध कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात बांगलादेशलाही मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच इबादतला दुखापत झाली होती.

असा आहे बांगलादेशचा संघ

शाकीब अल हसन (कर्णधार) , झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसुम अहमद, महमुदुल हसन खुशी, मोमिनुल हक, रजोर रहमान राजा, तस्कीन अहमद.

हेही वाचा :  आखाड्यात घुमणार शड्डूचा आवाज; 'महाराष्ट्र केसरी'च्या मानाच्या गदेचा इतिहास माहितीये का?

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …