New Parents in Bollywood: २०२२ मध्ये ‘या’ कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन, कपल्स झाले आई-बाबा

Bollywood Couples Who Became Parents in 2022 : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आलिया भट्ट प्रेग्नन्सी आणि त्यानंतर मुलगी राहा कपूरचा जन्म ही 2022 सालातील सर्वात मोठी बातमी होती. आलिया आणि रणबीर यांनी या वर्षी मुलीचे स्वागत अतिशय आनंदात केले. तर काही इतर बॉलीवूड जोडप्यांच्या घरेही या वर्षी गुंजली. काहींना पहिल्यांदा तर काहींना दुसऱ्यांदा पालक झाल्याचा आनंद मिळाला. चला जाणून घेऊया 2022 मध्ये कोणत्या सेलिब्रिटींना मूल झाले. त्याची नावे देखील पाहूयात.

​आलिया-रणबीरची मुलगी

रणबीर आलियाने ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या बाळाच स्वागत केलं. आलिया रणबीरने आपल्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं. राहा या नावाचा अर्थ आहे दिव्य मार्ग आणि आनंद. राहा हे अतिशय वेगळं नाव असून आलिया-रणबीरच्या चाहत्यांना हे नाव अतिशय आवडलं आहे.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​बिपाशा-करणची मुलगी

बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. कपलने या मुलीचं नाव ‘देवी’ असं ठेवलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी बिपाशा आणि करण यांच्या मुलीचा जन्म झाला आहे. बिपाशा-करणने मुलीचं ठेवलेलं नाव अतिशय गोड ठेवलं आहे. बिपाशाने आपल्या घरी देवीचं आगमन झाल्याच आनंदाने सांगते.

हेही वाचा :  अनलिमिटेड फन, मनोरंजन आणि खेळ; भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाचा नवा शो! | bharti singh haarsh limbachiyaa farha khan new comedy show the khatra khatra is coming soon

(वाचा – अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो, बाळांच्या हटके नावांनी सगळ्यांच लक्ष वेधलं))

​प्रियंका-निकची मुलगी

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या मुलीचा जन्म 15 जानेवारी २०२२ रोजी झाला. प्रियंकाने सरोगसीच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्याच सांगितलं. प्रियंकाचा चाहत्यांकरता सर्वात मोठा धक्का होता. मालती मेरी चोप्रा जोनस असं प्रियंकाच्या मुलीचं नाव आहे.

(वाचा – इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ))

​सोनम-आनंदचा मुलगा

ऑगस्ट २०२२ मध्ये सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या मुलाचा जन्म झाला. मार्च २०२२ मध्ये सोनमच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर चर्चेत आली. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या सोनमने मुलगा ‘वायु’ असं नाव ठेवलं आहे. वायु हे पंचतत्वांपैकी एक आहे. वायु हे अतिशय वीर नाव आहे.

(वाचा – मुलीचं नाव ठेवलं ‘शिवसेना’? काय आहे या नावामागची गोष्ट, कट्टर शिवसैनिकाने बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता)

​भारती-हर्षचा मुलगा

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया 2022 मध्ये एका मुलाचे पालक होणार आहेत. भारती सिंह तिच्या मुलाचे नाव ‘लक्ष’ ठेवले आहे. पण ती त्याला ‘गोला’ म्हणते. भारती अनेकदा तिच्या मुलासोबतचे गोंडस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा :  Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...

(वाचा- सुपरस्टार अलु अर्जुनने हिंदू देवताच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव, ऐकताच होईल परमेश्वराचं स्मरण))

​देबिना-गुरमीतचं दुसरं बाळ

2022 मध्ये देबिना बॅनर्जीला दोनदा आई होण्याची संधी मिळाली. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी आता दोन मुलींचे पालक आहेत. मोठ्या मुलीचं नाव ‘लियाना’ असं ठेवलं आहे. लियाना नावाचा अर्थ सूर्याची मुलगी असं आहे.

(वाचा – आजी-आजोबांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याचा नवा ट्रेंड, आलिया-प्रियांकाने फॉलो केल्या या गोष्टी)

अपूर्व-शिल्पाची मुलगी

अपूर्व-शिल्पाच्या घरी १८ वर्षांनी चिमुकल्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानी पडला. या दोघांनी ‘ईशानी’ असं बाळाचं नाव ठेवलं आहे. ईशानी या नावाचा अर्थ आहे ‘इच्छा’. या दोघांनी इंस्टाग्रामवरून नावाची माहिती दिली.

(वाचा – अजिंक्य रहाणेने शेअर केलं मुलाचं नाव आणि पहिली झलक, प्रभू रामाच्या अर्थाचे ठेवले नाव)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …