देशी तुपाचा त्वचा आणि केसांसाठी होतो अप्रतिम फायदा, जाणून घ्या तुपाचे गुण

नियमित तूप खाल्ल्याने त्वचेला फायदा मिळतो हे तर अगदी जगजाहीर आहे. पण तुपाचे सौंदर्यासाठी अनेक फायदे मिळतात हे सर्वांना माहीत नाही. अनेक घरांमध्ये आजही तूप तयार करण्यात येते. केवळ खाण्यासाठी याचा उपयोग न करता तुम्ही सौंदर्यासाठीही विशिष्ट पद्धतीने याचा उपयोग करून घ्या. यामुळे हिवाळ्यातही तुमची त्वचा मुलायम आणि तजेलदार राहण्यास मदत मिळेल. त्यासाठी याचा नक्की फायदा काय आहे जाणून घेऊया.

त्वचा मॉईस्चराईज्ड करण्यासाठी

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा कोणताही ऋतू असो त्वचेला मॉईस्चराईज्ड ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज असेल तर तूप तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज्ड ठेवण्यासाठी मदत करेत. देशी तुपाने त्वचेवर मसाज केल्यामुळे त्वचेवर चमकही येते आणि याशिवाय त्वचा कायम मॉईस्चराईज आणि मुलायम राहाते. तसंच अँटिएजिंग तत्व तुपात भरपूर असल्यामुळे फाईन लाईन्स आणि सुरकुत्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. तुपामध्ये असणारे विटामिन ई हे त्वचेला तारूण्य आणि चमकदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

(वाचा – Ghee benefits : आयुर्वेद एक्सपर्ट्सचा सल्ला, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हा’ 1 पदार्थ, आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर पडतील व झटपट होईल वेटलॉस!)

फाटलेल्या ओठांसाठी

ओठ फाटत असतील तर बाजारामध्ये अनेक क्रिम्स मिळतात. पण या क्रिम्समध्ये असणारे केमिकल्स ओठांवर काळेपणा आणतात. तुम्हालाही ओठ फाटण्याची समस्या असेल तर तुम्ही घरातील तूप नियमित ओठांना लावा. तूप कोमट करून मग ते ओठांना लावल्यास, त्याचा अधिक फायदा मिळतो. याशिवाय तुम्ही तुमच्या नाभीला अर्थात बेंबीला तूप लावल्यासदेखील ओठ नरम आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. तसंच नियमित तूप लावल्यास, ओठ फाटण्याची समस्याही दूर होते. तुपातील पोषक तत्वे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राखण्यास मदत करतात. तूप हे खरंतर नैसर्गिक स्क्रबदेखील आहे. त्यामुळे यामध्ये समान प्रमाणात साखर मिक्स करून ओठांवर एक्सफोलिएट करण्यासाठी लावा आणि हलक्या हाताने मसाज करून स्क्रब करा. तूप त्वचेत मिसळण्यावर टिश्यू पेपरने अथवा सुक्या कपड्याने पुसून घ्या. यामुळे ओठ फाटत नाहीत आणि मुलायम राहतात.

हेही वाचा :  कोलेस्ट्रॉल होईल झटपट कमी, तुपाबरोबर खा चपाती

(वाचा – आरोग्य विषयक अनेक लाभ मिळवून देतात हे 5 टॉप रेटेड Pure Desi Ghee पॅक, जेवणाचाही वाढवतील स्वाद)

डोळ्याखालील काळी वर्तुळं घालविण्यासाठी

सततच्या तणावामुळे त्वचेवर अथवा डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं हे काही नवं नाही. हे डाग घालविण्यासाठी कोणत्याही ट्रिटमेंट घेण्यापेक्षा तुम्ही तुपाचा फायदा घ्यावा. डोळ्यांखाली आणि आसपास तुम्ही तुपाने मालिश करा. हलक्या हाताने मालिश करून तुम्ही रात्री झोपा. यामुळे केवळ काळी वर्तुळंच जाणार नाहीत तर तुमचा दिवसभराचा थकवाही दूर होण्यास मदत मिळते. तसंच त्वचा निस्तेज झाली असेल तर तुपातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड, विटामिन ए, डी, बी१२, के आणि ई ही तत्वे त्वचेला पोषण देतात आणि त्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार राहण्यास मदत मिळते. तसंच तूप हे त्वचेतील इलास्टिसिटी वाढवून त्वचा तरूण राखण्यास मदत करते.

(वाचा – हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘तुप’ अत्यंत फायदेशीर, असा करा वापर)

त्वचेला देते पोषण

त्वचेला पोषण देण्यासाठी तूप हे उत्तम साधन आहे. तूप आपल्या डाएटमध्ये समाविष्ट केल्यास, आतून शरीराला पोषण देत त्वचेला मॉईस्चराईज करते. तसंच यातील आढळणारे विटामिन हे कोलेजन स्तर वाढविण्यास फायदेशीर ठरून त्वचा तरूण राखण्यास मदत करते. यातील विटामिन ए हे नैसर्गिक मॉईस्चराईजरचे काम करते. तसंच शरीरातील प्रतिकारशक्तीही वाढवते. तुपाच्या फेसपॅकमुळे त्वचा अधिक उजळते आणि यात हळद मिक्स करून वापरल्यास, तुमची त्वचा अधिक तरूण दिसते. तूप आणि पाणी एकत्र समान प्रमाणात मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास, त्वचा अत्यंत सॉफ्ट राहते.

हेही वाचा :  पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकिटदर

(वाचा – गायीच्या pure ghee चे सेवन ठरेल लाभदायक, मिळवा एक लिटरचे पॅक)

केसांना मऊपणा देण्यासाठी

तुपाचा फायदा केसांसाठीही होतो. तूप कोमट करून तुम्ही केसांना लावा आणि स्काल्पला लावून मसाज करा. यामुळे राठ केसदेखील मऊ राहतात. तसंच यामध्ये असणारे विटामिन ई आणि ए हे केसांची वाढ होण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर आहे. केसांना फायदेशीर ठरण्यासाठी तुम्ही २ चमचे तूप, १ चमचा नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि हे कोमट करा. तेल आणि तूप एकत्र मिक्स व्हावे यासाठी कोमट करून घ्या आणि मग केसांवर मसाज करा. अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा. केसांना मुळापासून कंडिशन करण्यासाठी याचा उपयोग होतो.

तूप हे केवळ खाण्यातच नाही तर तुमच्या आरोग्याच्या, केसाच्या आणि त्वचेच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. त्यामुळे याचा अतिरेक न करता योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उपयोग करून घ्या.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र …

योग्य ती वेळ…! रोहित विराटच्या ‘निवृत्ती’वर शरद पवारांनी साधलं ‘टायमिंग’, म्हणाले…

Rohit Sharma Virat Kohli Retirement : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत …