”सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर” ‘जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

CM Eknath Shinde Reaction : महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Sangli, Jath) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) गंभीर आरोप केला आहे.  राज्यातलं सरकार तातडीने घालवलं नाही तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा निषेध करत अन्याय सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलीय.

मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, जत वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही मागणी 2012 मधली होती, त्यावेळी त्या भागात पाण्याची टंचाई होती, पण आता बऱ्याचशा योजना केल्या आहेत. अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय, पाण्यावाचून राज्यातील कोणतंही गाव इथे तिथे जाणार नाही, एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, तसंच त्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या युद्धपातळीवर सोडवल्या जातील, याची काळजी सरकार घेईल असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलंय.

हेही वाचा :  आता Whatsapp वर फोटो सेंड करतानाही क्वॉलिटी होणार नाही खराब, HD Quality मध्ये पाठवता येणार Photo

‘सीमावाद सामोपचाराने सोडवण्याव भर’
हा विषय सामोपचाराने (Maharashtra Karnataka Border Dispute) सोडवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची बैठक झालेली आहे, केंद्र सरकारही सकारात्मक भूमिका घेईल, हा विषय सामोपचाराने सोडवला जाईल अशी आमची भूमिका आहे. अनेक योजना आणि लाभ मिळत होते, त्यात सुधारणा केली. यात आणखी वाद निर्माण करु नये असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी केलंय.

हे ही वाचा : ‘तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल’ संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘एकही गाव…’

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
सांगलीतल्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई होती. या तालुक्याला पाणी देऊन आम्ही पाणी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला असा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचयातींनी कर्नाटकात सामील होऊ इच्छितो असा ठराव केला होता, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, राज्याराज्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असा इशाराही बोम्मई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …