प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

नुकतच प्राजक्ताच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं. याच लग्नसोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर व केसांत गजरा माळून पारंपरिक लूक केला होता. मराठमोळ्या साडीत ती फारच सुंदर दिसत होती. तिने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​प्राजक्ताचा रॉयल लूक

यावेळी प्राजक्ताने हिरव्या रंगाच्या साडीत सर्वांचे मन वेधून घेतले. प्राजक्ता माळी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सध्या प्राजक्ता भावाच्या लग्नात मस्त एन्जॉय करतीये. याच लग्नासाठी प्राजक्ताने मराठमोळा साज शृंगार केला होता. तिचे हे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या हिरव्या रंगाच्या नऊवार साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं पारंपारिक दागिने देखील घातले आहेत. (वाचा :- हॉटनेस ओवरलोड! ब्लू रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लूक, जलपरी म्हणत शेअर केला फोटो)

हेही वाचा :  महापारेषणमध्ये 2,541 पदांची भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

​प्राजक्ताने परिधान केलेले दागिने

यावेळी प्राजक्ताने मराठमोळा साज करत. अगदी पारंपारिक दागिने परिधान केले होते. यामध्ये तीने बकुळीच्या फुलांची माळ परिधान केली आहे. तर मोठी ठुशी घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. त्याच प्रमाणे यावेळी तिने नाकामध्ये मोठी नथ घातली होती. तर हातामध्ये सुंदर बांगड्या देखील परिधान केल्या होत्या. (वाचा :- G20 Summit: पंतप्रधान मोदींचा स्वदेशी कपड्यांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट पाहा फोटो)

​मेकअप

यावेळी प्राजक्ताने लाईट मेकअप केला होता. यावेळी तिच्या कपाळावर असणाऱ्या चंद्रकोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता सुरु असलेल्या लग्नाच्या हंगामामध्ये तुम्ही देखील प्राजक्ताप्रमाणे लूक कॅरी करु शकता. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​हटके कॅप्शन

या फोटो सोबत प्राजक्ताने हटके असे कॅप्शन दिला आहे ‘भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं, दागिने थेट कोल्हापूरवरून आणलेत. तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावला.’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (वाचा :- लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हॉट अंदाज, चाहते म्हणतात ‘मराठीतली उर्फी नको बनूस’)

हेही वाचा :  Video : अमेरिकेत बर्फसृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण!

​चाहत्यांच्या कमेंट्स

प्राजक्ताच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. या फोटोवर एका चाहत्याने ”फोटो पाहून आमचा जीव सुखावला” तर दुसऱ्या चाहत्यांने आता मी लग्न करु का नको असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर प्राजक्ताने देखील करुन टाक माझा काही भरवसा नाही अशी कमेंट केली आहे. (वाचा :- आयराच्‍या एंगेजमेंटमध्‍ये रीना दत्ता सोडून किरण रावकडे सर्वांच्या नजरा, सख्या आईपेक्षा सावत्र आईचीच दमदार एन्ट्री)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …