Video : अमेरिकेत बर्फसृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण!

Bomb Cyclone Video :  चीनमध्ये कोरोनाने (China Corona news) थैमान घातला असतानाच अमेरिकेत कोरोनाच्या (Corona in America) रुग्णांमध्येही वाढ होते आहे. अशातच अमेरिकेवर अजून एक संकट ओढवलं आहे. कडाक्याची थंडी आणि त्यात मुसळधार बर्फसृष्टीने असं दुहेरी संकटामुळे अमेरिकन त्रस्त आहेत. ख्रिसमसच्या उत्सावाला या बर्फसृष्टीने ब्रेक लावला आहे. या महाभयानक बर्फसृष्टीमुळे (heavy snowfall) सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शिकागो, डेन्व्हरसह अमेरिकेतील (chicago, America, Denver) अनेक शहरांमध्ये थंडीने कहर केला आहे. अनेक भागात तापमान खाली कोसळलं आहे. अमेरिकेत बर्फसृष्टीमुळे निर्माण झालेले भयान वास्तवाचे व्हिडिओ सोशल  मीडियावर व्हायरल (video viral social media) होतं आहेत. 

बर्फसृष्टीचा फटका

अमेरिकेत प्रचंड बर्फवृष्टी होत असून जवळपास 70 टक्के नागरिकांना याचा फटका बसतोय. जोरदार बर्फवृष्टी, वेगाने वाहणारे थंड वारे यामुळे अनेक भागांमध्ये तापमान सध्या उणे 36 डिग्री सेल्सियसवर गेलंय. ख्रिसमसच्या तोंडावरच तिथल्या लोकांना बर्फवृष्टीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. 

प्राण्यांचे हाल 

अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टी सुरूये. आर्क्टिक प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अर्ध्या अमेरिकेला बर्फाने वेढलंय..त्याचा परिणाम प्राण्यांवरही होतोय..मोंटानामध्ये जनावरं थंडीपासून बचाव करण्यासाठी बर्फातून पळापळ करतायत. जनावरांचे गोठे, गवत पूर्णपणे बर्फाने झाकली गेलीयत.

हेही वाचा :  Weather Update: मुंबईत गुलाबी थंडीचं राज्य; आठवडाभर राहणार मुक्काम; जाणून घ्या खास कारण

रस्ते आणि विमान वाहतुकीवर परिणाम 

मीडिया रिपोर्टनुसार या बर्फसृष्टीमुळे रस्ते आणि विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आतापर्यंत 2,270 हून अधिक यूएस फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय 7,400 हून अधिक उड्डाणे उशिरा झाले. 

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने रविवारपर्यंत देशात 4 फूट बर्फ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जोरदार हिमवृष्टीच्या संभाव्य धोक्यामुळे पश्चिम न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. (video Bomb Cyclone wreaks havoc in America and heavy snowfall 2 thousand flights canceled)

बॉम्ब चक्रीवादळ काय आहे?

बॉम्ब चक्रीवादळ याला स्फोटक चक्रीवादळ असंही म्हणतात. जेव्हा वातावरणात अचानक कमी दाबाची प्रणाली विकसित होते तेव्हा असे परिणाम दिसून येतात. त्यामुळे हवेच्या दाबात झपाट्याने घट होते. मग अशावेळी जोरदार हिमवर्षाव, पाऊस, जोरदार वारे आणि गडगडाटीसह वादळ येतात. बॉम्ब चक्रीवादळ सहसा हिवाळ्यात येतात, मत्र कधी कधी हे इतर ऋतूंमध्येही हे वादळ येऊ शकतं. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशारामुळे लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …