भांडण झाल्यावर पती-पत्नी अनेकदा करतात या 3 चुका, असे वाचवा तुमचे नाते

लग्न झाल्यानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. कोणतेही नात्यात चढ-उतार असणे सामान्य आहे. पती-पत्नीचे नातेही याला अपवाद नाही. पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाबरोबरच संघर्षाचाही समावेश असतो. अनेक वेळा हा संघर्ष इतका वाढतो की दोघेही आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात. पण नात्यातील काही चुका आयुष्य बदलून टाकतात. चाल तर मग जाणून घेऊयात नात्यातील काही शुल्लक चुका ज्यामुळे तुमचे नाते वाचवू शकता. पती-पत्नीमध्ये जेव्हा कधी भांडण होते, तेव्हा भांडण होऊनही तणाव कायम असतो. असे घडते कारण भांडण संपल्यानंतरही पती-पत्नीकडून काही चुका होतात. या चुका टाळल्या तर पती-पत्नीचे नाते पुन्हा नव्याने बहरु शकते. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​पहिली चूक

भांडणानंतर पती-पत्नी अनेकदा एकमेकांना असे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जणू काही घडलेच नाही. ते एकमेकांशी बराच वेळ किंवा एक-दोन दिवसही बोलत नाहीत, पण यामुळे समस्या सुटत नाही. पण हे चुकीचे आहे. भांडण झाल्यावर राग शांत झाल्यावर दोघांनी एकत्र बोलावे. एकमेकांची माफी मागितली पाहिजे. नात्यात माफी मागितल्याने कोणी छोटं मोठं नसतं ही गोष्ट लक्षात घ्या. (वाचा :- ओव्हर पझेसिव्हनेसमुळे नात्यात दुरावा आलाय, आवडती व्यक्ती दूर जाताना दिसतेय, तर आताच ही कामं करा)

हेही वाचा :  माझी कहाणी : कधी म्हैस तर कधी हत्ती अशा विचित्र नावाने पती हाक मारतो, माझ्या लठ्ठपणामुळे शरीरच ठरतेय शाप

​दुसरी चूक

सोशल मीडियाच्या जमान्यात असेही दिसून आले आहे की, भांडण झाल्यानंतर अनेक पती-पत्नी सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारतात किंवा स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने संबंध कायमचे तुटू शकतात. रागाच्या भरात अशी पोस्ट देखील केली जाऊ शकते ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक होतील. त्यामुळे जेव्हा जेव्हा भांडण होईल तेव्हा त्याबद्दल सोशल मीडियावर काहीतरी लिहिण्याची चूक करू नका. तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्व सामाजिक करु नका. (वाचा :- माझी कहाणी: एका महिन्यात माझं १० किलो वजन वाढलं, नात्यातील नैराश्यामुळे माझ्या खाण्यावर माझे नियंत्रण नाही)

​तिसरी चूक

अनेकदा पती-पत्नीच्या भांडणानंतर प्रकरण जास्त वाढू नये या विचाराने ते सोडवत नाहीत. ज्या मुद्द्यावर भांडण झाले आहे ते सोडवलाच पाहिजे. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये. समस्या सोडवल्यानंतरच नाते पुढे जाऊ शकते. त्यामुळे आपापसात बोला आणि भांडणाचे प्रश्न सोडवा. समस्यावेळेत सोडवा. (वाचा :- प्रिती अदानीला अजिबात आवडले नव्हते गौतम अदानी, मग असं फुललं नातं आणि झाला 36 वर्षांचा सुखाचा संसार)

हेही वाचा :  Maharashtra Farmer : घरात बसून करतोय शेताची राखण; शेतकरी कधी काय करेल याचा नेम नाही

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …