इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे. 

केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्षे केदार शिंदे आणि बेला शिंदे हे सुखाचा संसार करत आहेत. पण या दोघांनी एकत्र यावं हे त्यांच्या कुटुबियांना मान्य नव्हतं… अगदी पळून जाऊन लग्न करावं अशी वेळ केदार शिंदे यांच्यावर आली.. केदार-बेला यांच्या लव्हस्टोरीमधून जाणून घेऊया Couple Goal … 

अशी झाली होती 

केदार शिंदे हे ‘लोकधारा’मध्ये नृत्य शिकवत. बेला शिंदे यांची मोठी बहिण लोकधारा या ग्रुपमध्ये डान्स करायची. एकेदिवशी बेला आपल्या बहिणीचा डान्स पाहायला गेल्या. बेला यांनाही नृत्याची आवड असल्याने त्यासुद्धा या ग्रुपमध्ये जाऊ लागल्या.  याचकाळात केदार आणि बेला यांची चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीदरम्यानच त्यांच्यात प्रेम फुलायला लागले होते. केदार यांनीच बेला यांना पहिल्यांदा प्रपोज केले होते. मात्र त्यावेळी बेला यांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. 

हेही वाचा :  Optical Illusion : 'या' फोटोमध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय? पाहा तुमचा मेंदू कसा काम करतो?

1 एप्रिल तारीख का महत्त्वाची 

हार मानतील ते केदार शिंदे कसले.. काही महिने नाही तर तब्बल दोन वर्षे केदार शिंदे बेला यांच्या मागे होते. अखेर दोन वर्षांनी बेला यांनी केदार यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. पण याची देखील एक गंमत आहे. बेला यांनी केदार शिंदे यांना होकार दिला… त्या होकाराच्या आनंदात अभिनेता आणि केदार शिंदे यांचा मित्र अंकुश जोशी हे एका इराणी हॉटेलात चहा- बनमस्का खायला गेले. अचानक केदार शिंदे यांना आठवलं की,’आज 1 एप्रिल आहे.. बेलाने आपल्याला एप्रिल फूल तर केलं नाही ना?’ मनात हा प्रश्न आल्यावर वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. 

त्याकाळी मोबाईल नव्हते. आणि बेला यांच्या घरी लँडलाईवर फोन करण्याची केदार यांची हिंमत नव्हती. पण नंतर बेला यांनी आपण प्रेमाता स्वीकार केल्याची कबुली दिली. बेला म्हणतात की, ‘ती त्या १ एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती, बेला के फूल बनून.’

का होता घरातून विरोध 

केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू. ‘लोकधारा’ हा ग्रुप त्यावेळी अतिशय लोकप्रिय होता. पण शेवटी ते नाटकवाले… नाटक किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या मुलांच्या भविष्याबद्दल फार शाश्वती नसते. त्यामुळे बेला शिंदे यांच्या घरातून लग्नाला विरोध करण्यात आला होता. त्याकाळात आणि आजही सिनेसृष्टीबाबत शाशंक लोक पाहायला मिळतात. या क्षेत्रात सातत्य नाही आणि स्थिरता नाही असं अनेकांच मत आहे. 

हेही वाचा :  डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही

या लव्हस्टोरीतून काय शिकाल 

केदार-बेला शिंदे कळत नकळत आपल्याला त्यांच्या नात्यातून बऱ्याच गोष्टी शिकवतात. जसे की, केदार शिंदे यांनी आपल्या खऱ्या प्रेमासाठी दोन वर्षे वाट पाहिल. 
आज या दोघांच्या नात्याला 27 वर्षे झाली. पण आजही एकमेकांना खंबीर साथ देत आहेत.
केदार शिंदे अनेकदा सोशल मीडियावर बेला शिंदे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करतात. 
यामध्ये बेला शिंदे यांची आपल्या संसारात, व्यवसायात खंबीर साथ असल्याचं ते मान्य करतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …