अपयशाला खचून न जाता हिमतीने लढले ; परभणीच्या सुमंतची IFS परीक्षेत बाजी !

UPSC Success Story : कोणतीही परीक्षा म्हटलं की यश‌ – अपयश या सोबत सामना करायला लागतोच. पण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता. त्यातून शिकून यशाचा मार्ग काढायला हवा. सुमंत साळुंके यांनी देखील हेच अवलंबले. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. अत्यंत सामान्य घरातील मुलगा…पण त्याची जिद्द खूप होती.

सुमंत हा मूळचा परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कुपटा या गावचा रहिवासी. त्याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. त्यानंतर त्याने सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०२१ मध्ये बी.टेक पदवी मिळवली.

मूळात त्याला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. त्यामुळे पदवी शिक्षण झाल्यावर त्याला नोकरीच्या बऱ्याच संधी होत्या. पण त्या वाटेवर न जाता. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.‌याच निर्धाराने तो पुण्यात गेला. तिथे राहून त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.लगेच दोन वर्षांनी त्याने २०१४ मध्ये आय.एफ.एसची परीक्षा दिली. पण कारणास्तव त्याची संधी गेली. त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. हार न मानता २०१५ला पुन्हा एकदा परीक्षा दिली. यावेळी आधी झालेल्या चूकांवर लक्ष देऊन त्यावर उपाय शोधला. त्यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील सुमंत सोळंके याने जिद्दीच्या बळावर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) या परीक्षेत देशात तिसरा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळविला.

हेही वाचा :  RITES मध्ये निघाली भरती, परीक्षेशिवाय होणार निवड, 85000 महिना पगार मिळेल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

झपाटून अभ्यास केला आणि विलास झाले उपजिल्हाधिकारी!

MPSC Success Story : आपण जर दिवसरात्र अभ्यास केला तर एक ना एक दिवस या …

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती

ICF Recruitment 2024 इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन …