सोरायसिसमध्ये शरीरावर येणारे लाल पुरळपासून हे ६ सुपरफुड देतील आराम

सोरायसिस हा त्वचेचा सामान्य आजार आहे. यामध्ये त्वचेवर लाल खाज सुटणारे चट्टे तयार होतात. पण काही उपचार पर्यायांच्या मदतीने, सोरायसिसची लक्षणे कमी केली जाऊ शकतात. हा आजार काही आठवडे किंवा महिने राहिल्यानंतर काही काळ बरा होतो आणि नंतर परत येतो. सोरायसिस हा अतिक्रियाशील रोगप्रतिकारक शक्तीचा रोग आहे. अशा परिस्थितीत, तज्ञ जीवनशैलीत आवश्यक बदल करायला सांगतात. आपल्या आहारातील असे काही पदार्थ आहेत जे आजारापासून होणारा त्रास कमी करतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

​6 प्रकारचे सोरायसिस रोग

6-

मेयोक्लिनिकच्या मते, सोरायसिसचे 6 प्रकार आहेत, ज्यामध्ये प्लेक सोरायसिस सर्वात सामान्य आहे. याशिवाय, नेल सोरायसिस, गट्टेट सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पस्ट्युलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस देखील आहे.

  • सोरायसिसची लक्षणे
  • त्वचेची जळजळ
  • लाल फिकट त्वचा
  • वेदनादायक आणि खाज सुटलेली त्वचा
  • त्वचेला तडे जाणे ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो
  • नखे आणि बोटांच्या रंगात बदल
  • स्कॅल्पवर स्केल आणि स्पॉट्स
हेही वाचा :  १०० कोटीचा आलिशान बंगला, शिल्पा शेट्टीच्या घराचे इंटिरिअर पाहाल तर म्हणाल हा तर राजवाडाच

​सोरायसिसमध्ये चेरी करेल जादुई काम

हार्वर्डच्या मते, सोरायसिसमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अन्न फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सोरायसिसचा त्रास होत असेल तर चेरीचे सेवन करा.

​कांदा खाण्याचा फायदा

कांदा नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून काम करतो . जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सोरायसिस नियंत्रणात ठेवते. हे आतड्यांतील निरोगी जीवाणूंना चालना देण्यासाठी देखील कार्य करते. त्यामुळे तुमच्या जेवणात कांद्याचा वापर करा.

​अक्रोडामुळे सोरायसिस नियंत्रणात राहतो

सोरायसिसच्या रुग्णांसाठी अक्रोड फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ मोठ्या प्रमाणात असतात, यामुळे जळजळ कमी होते. याशिवाय अक्रोड सोरायसिसच्या इतर लक्षणांवरही नियंत्रण ठेवते.

​सोरायसिस साठी हळद घरगुती उपाय

हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे जळजळ कमी करत नाहीत, परंतु सोरायसिसमुळे होणारे नुकसान दुरुस्त करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे. त्यामुळे तुमच्या आहारात हळदीचा वापर करा.

​सोरायसिसमध्ये या पदार्थांचे सेवन करा

जर तुम्हाला सोरायसिसचा त्रास होत असेल तर ब्लू बेरी, ऑलिव्ह ऑईल, मासे यांचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच, दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोल, तळलेले अन्न सेवन केल्याने सोरायसिस गंभीर होतो, त्यामुळे त्यापासून चार हात दूर राहा.

हेही वाचा :  'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …