‘आता रडायचं नाही लढायचं’, संजय राऊतांनी मुलगी पूर्वशीच्या साथीचं केलेलं कौतुक, असं फुलतं बाप-लेकीचं नातं

बाप आणि लेकीचं नातं असं खास असतं. लेकीसाठी जसा बाप हा खंबीर आधार असतो. अगदी तसंच बापासाठी लेक हा अभिमान आणि मोठा आधार असते. आपल्या मागे पूर्वशी राऊत न डगमता खंबीर उभी राहिली, रडली नाही ही संजय राऊतांसाठी देखील अभिमानाची बाब होती. (फोटो सौजन्य – पूर्वशी राऊत फेसबुक / टाइम्स ऑफ इंडिया)

​सोशल मीडियावर पूर्वशीने अशी व्यक्त केली भावना

अनेकदा काही गोष्टी बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते. एक फोटोच सारं काही बोलून जातो. अगदी त्याच पद्धतीने संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच. पूर्वशीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्या फोटोत ती आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारत आहे. यावरून दोघांचं नातं देखील किती घट्ट आहे याची कल्पना येते.

या फोटोला फक्त तिने दोन इमोजी देत भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यामध्ये पहिला इमोजी हा डोळ्यातून पाणी येणारा आहे तर दुसरा इमोजी हा हार्ट शेप हृदयाचा आहे. हे दोन इमोजी पूर्वशीच्या भावना व्यक्त करत आहे.

(वाचा – साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने भगवान बुद्धांच्या नावावरून ठेवलं मुलांच नाव, मुलं होईल अतिशय संयमी)

हेही वाचा :  Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ED ची धाड

​ईडी कार्यालयाबाहेर व्याकूळ होती पूर्वशी

वडिलांच्या एका भेटीसाठी पूर्वशी व्याकूळ झाली होती. अटक झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयासमोरचा पूर्वशी राऊत आणि सुनील राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यात पूर्वशी वडिलांना एकदा भेटण्यासाठी व्याकूळ झाली होती.

(वाचा – अभिनेत्री Urmila Nimbalkarच्या ‘आईपण’ चा अनुभव, बाळाची तुलना करण्यावर बोलली उर्मिला, वाचा ७ टिप्स)

​पूर्वशीच्या पाठीवणी वेळी संजय राऊतांची हळवी बाजू समोर

बापाच्या अंगणात लेक कितीही मोकळेपणाने बागडली तरी तिला एक दिवस सासरी जावं लागतं. संजय राऊत आणि पूर्वशी यांच्या आयुष्यातील हा क्षण अतिशय भावूक होता. पूर्वशीचं नोव्हेंबर २०२१ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मुलाशी मल्हार नार्वेकरशी लग्न झालं.

या लग्नाच्या पाठवणी वेळी कडाडून गरजणारे संजय राऊत एक बापाच्या रुपात दिसले. या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा संजय राऊत लेकीच्या पाठवणीत हळवे झाले होते. त्यांना आपले अश्रू थांबविता आले नाहीत.

(वाचा – आक्रमक Virat Kohli मध्ये लपलाय संवेदनशील आणि भावनिक ‘बाप’, लेक Vamika साठी असा आहे तिचा ‘विराट बाबा’)

​बापासाठी खंबीर आधार असते लेक

लेक आणि बापाचं नातं हे कायमच खास असतं. मुलीसाठी जसा तिचा बाबा जगातील ‘बेस्ट बाबा’ असतो. अगदी तसंच बापासाठी लेक हा खंबीर आधार असते. कोणत्याही परिस्थितीत बापासोबत लेक उभी असेल तर तो कोणतंही युद्ध किंवा परिस्थिती जिंकू शकतो. हा विश्वास लेकीच्या साथीने मिळतो. हाच विश्वास आपल्याला संजय राऊतांच्या त्या भाषणात ऐकायला मिळाला.

हेही वाचा :  40 वर्षांच्या संसारात शबाना आझमी व जावेद अख्तर कधीच नाही भांडले, या जादुई ट्रिकची सर्व कमाल

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

​बापासाठी लेकीचा विश्वास अतिशय महत्वाचा

कुणीही कितीही आरोप केले किंवा बापावर अविश्वास दाखवला तरीही मुलीचा विश्वास हा बापासाठी महत्वाचा असतो. जर बाप कठीण प्रसंगात अडकला असेल पण लेक त्याच्यावर विश्वास ठेवत असेल. तर तो जगाचा विचार करत नाही. अशावेळी बापाने हा विश्वास जिंकण्यासाठी कायमच प्रयत्न करायला हवेत.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​बापासाठी यासाठी मुलीला स्वावलंबी बनवावे

मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्या स्वतंत्र विचार करू शकतात. अशावेळी बापाने मुलीला स्वावलंबी बनवावे. तिचे निर्णय तिला घेण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे. कारण यामधूनच मुलगी मोठी होते आणि ती बापासोबत खंबीर उभी राहते.

(वाचा – स्मार्ट रविचंद्रन अश्विनने दोन्ही मुलींची नावे ठेवली इतकी भारी, अर्थ जो प्रत्येकाच्या मनाला भावेल))

​तिला ठाम मत मांडू द्या

पालकांनी कायमच मुलांसमोर अतिशय खरं खुरं वागलं पाहिजे. खास करून वडिलांनी. कारण लेक कायमच वडिलांनी आदर्श मानत असतं. अशावेळी तुम्ही जे खरं आहे सत्य आहे. त्या सगळ्याची बाजू ठामपणे मांडणे महत्वाचं आहे. कारण यामधून मुलीला आत्मविश्वास मिळणार आहे. मुलीला भविष्यात अतिशय स्ट्राँग आणि यशस्वी बनवायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी ठरवून केल्या पाहिजेत.

हेही वाचा :  लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​मुलीच्या कायम पाठिशी उभे राहा

प्रत्येक मुलाचं एक स्वतंत्र्य विश्व असतं. या विश्वात ते रममाण असतात. यावयात त्यांची स्वतःची मत तयार होत असतात. त्यांना भावना असतात. या सगळ्यात बदलात एक बाप म्हणून तुम्ही त्यांच्या कायमच पाठिशी उभे राहा. मुलीसाठी आपला बाप आपल्या सोबत आहे ही भावनाच अतिशय खास असते.

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …