Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?

विष्णू करोळे, झी मीडिया, औंरगाबाद: नुकतीच औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की हे सरकार पडणार यांच्यासाठी देवेंद्र फडणीसांनी कॉंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या हातून मुख्यमंत्रीपद, उप-मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी हे आमदार (Latest Political update) तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे ते 16 आमदार गेल्यानंतर त्याजागी देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत, असं भाकित केलं आहे. (Political leader chandrakant khaire says devandra phadnvis will take 22 mla from congress after losing their 16 mla)

सध्या कॉंग्रेसची मोठी यात्रा सुरू आहे. भारत छोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले नाही हे आमदार कॉंग्रेसचे आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार असल्याची भविष्यवाणी खैरे यांनी यंदा वर्तविली आहे. 

देवेंद्र फडणवीस हुशार माणूस काँग्रेसचे 22 आमदार भाजप फोडणार, त्यांची ठाण्यात ताकद असली तरी मग आमचे ठाण्याचे खासदार का गेले. शेवटी सगळेच, जनता पाहत असते की कोणी काय खोके घेतले आणि कोणी काय केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. 40 आमदार तर पडणारच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण पडणार. जेथे  छगन भुजबळ, नारायण राणे सुद्धा पडले होते तिथे हे काय? असा हल्लाबोल्ल खैरें यांनी केला आहे.  

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत कासवांमध्ये लपलेला साप शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

संतोष बांगरांवरही चंद्रकांत खैरेंची टीका… 

बांगर नेहमी वादात असतात, मारहाण करतात. त्याचे सगळे धंदे पोलीसांना माहीत आहेत. भारतीय जनता पार्टी (BJP) यांना कसं सहन करतात? संघ, फडणवीसही त्यांना कसं सहन करतात. पूर्वी कट्टर शिवसैनिक होता परंतु आता तो नाही, अशी खळबळजनक टीका चंद्रशेखर खैरे यांनी केली आहे. नवनवीन राणा 5 ते 6 दिवस कुठे होत्या? बचू कडू (Bacchu Kadu) बोलत होता तेव्हा गायब होत्या. वाद मिटला आणि आता समोर आल्या आहेत. अब्दुल सत्तार खोड्या करणारा माणूस आहे. 17 पक्ष फिरून आलाय. सरड्या सारखा रंग बदलतो. त्यांनी मुंबईत एकाच वेळी सभा ठेवून हास्य करून घेतलं. तो माणूस पैसे गोळा करून माणसं आणेल मात्र आमची सभा यशस्वी होईल.

महाराष्ट्राच्या राजकारण नवे रणांगण? 

आंबदास दानवे यांनी राज्यात काम करावं, ते काम करत आहेत. इकडे कार्यकर्ते आहेत इकडचे काम ते करतील, मी सुद्धा इकडे आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये जोरदार वादळं सुरू झालं आहे. त्यामुळे सगळीकडेच राजकीय वातावरण तापलं आहे. याचा पडसाद आता सगळीकडेच उमटायला लागला आहे. तेव्हा आता मंत्रिमंडळं विस्ताराच्या पाश्वभुमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंगागण पेटले आहे. 

हेही वाचा :  सोनं की सोव्हेरियन गोल्ड? तरुणांनी कुठे करायला हवी गुंतवणूक? जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …