Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत विमा कंपन्या शेतकर्‍यांची नुकसानभरपाई वेळेत देत नाहीत, हवामान केंद्रांची मोजमापे सदोष आहेत, नुकसान भरपाईचे (Latest Political Update) निकषही शेतकऱ्यांचेच नुकसान करणारे आहेत (Maharashtra Politics) व शेतकऱ्यांना या विमा कंपन्या दाद देत नाहीत अशा तक्रारी जिल्हावासीय शेतकर्‍यांनी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासमोर मांडल्या. विमा कंपन्या, कृषी विद्यापीठ, शासनाचे कृषी आयुक्त कार्यालय हवामानाचे मोजमाप घेणारे स्कायमेट या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 12 डिसेंबरला घेऊन जिल्ह्यातील शेतकर्यांना न्याय देऊ अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी या बैठकीत दिली. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकर्‍यांची 6 कोटी 34 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली. (6 crore 34 lakh rupees compensation of farmers from the insurance company success to mla nitesh ranes efforts)

त्याबद्दल सर्वच शेतकर्‍यांनी या सभेच्या सुरुवातीसच आमदार नितेश राणे यांचे उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या इतिहासातील अशी पहिली बैठक शनिवारी झाली. आमदार नीतेश राणे, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मार्गदर्शन केले. बँकेचे संचालक श्री बोडस प्रकाश मोर्ये जिल्हा बँकेचे सीओ प्रमोद गावडे जिल्हा कृषी अधिकारी डी एस दिवेकर कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरूण नातू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पराग म्हसले, जिल्हा समन्वयक करिश्मा धनराज, रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक अधिकारी येडवे या अधिकार्यांसह जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :  ही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अ‍ॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच...

विमा कंपन्यांनी आपल्या सोयीचे निकष बनवले असून जिल्ह्यातील उष्णतामान वाऱ्याचा वेग पाऊस वादळ याबाबतचे निकष आंबा पिकासाठी भात पिकासाठी सोयीचे नाहीत. अशा निकषामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेले हवामान केंद्रे ही स्कायमेट (Skymate) या यंत्रणेकडून हाताळली जातात व तापमान व हवामानाची नोंद घेतली जाते. मात्र ही हवामान केंद्रे चुकीच्या ठिकाणी व यासाठी वापरलेले गेलेले यंत्रणेत त्रुटी असल्याने ही यंत्रणा अद्ययावत नसल्याने योग्य हवामानाच्या नोंदी होत नाहीत व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो याकडेही शेतकर्यांनी लक्ष वेधले. एका तालुक्यात हवामान मोजमापाची माहिती दिली जाते पण अन्य तालुक्यांत शेतकर्यांना हवामान मोजमापाची माहिती दिली जात नाही याकडेही शेतकर्यांनी लक्ष वेधले. 

नितेश राणेंनी दिली ग्वाही : 

ज्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन होतो त्या भागात कमी नुकसानभरपाई तर ज्या भागांत अल्प आंबा होतो त्या भागात मोठी नुकसानभरपाई याकडेही काही शेतकर्यांनी लक्ष वेधले. 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये विमा कंपनीच्या पातळीवरील व आयुक्त पातळीवरील जे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू शासनस्तरावरील जे प्रश्न आहेत ते अधिवेशनकाळात मांडू व हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे व हे आता सरकार बदलले आहे याची जाणीव पण सर्वसामान्यांना होईल असे काम आपण लक्ष देऊन करू अशी ग्वाहीही आमदार नितेश राणे यांनी दिली.

हेही वाचा :  Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला

बीड पॅटर्नप्रमाणे सिंधुदुर्ग पॅटर्न हवा! जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी :

बीड जिल्ह्याने फळ व पीकविम्याबाबत शासनाकडून बीड पॅटर्न मंजूर करून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईतील तफावत दूर करण्यासाठी हा बीड पॅटर्न महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्र सरकार राज्य सरकार व शेतकर्यांचा हिस्सा अशा एकूण रक्कमेतून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. बीड जिल्ह्याने विमा कंपनीचा मार्जिन मनी राखीव ठेवून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी दिली जाते व हा बीड पॅटर्न या जिल्ह्यातील शेतकर्यांना सोयीचा असून तो या जिल्ह्यांतही लागू करावा त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली. तसेच जिल्ह्यातील या फळपीक विमा बाबत शेतकऱ्यांसमोर ज्या अडचणी आहेत त्या अभ्यासपूर्ण मांडल्या!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …