फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यानंतर ‘स्विच ऑफ’ येतोय का?; या सोप्या ट्रिक्सने फोनपर्यंत पोहोचता येणार

नवी दिल्लीः तुमचा महागडा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज आपण अनेक जण मोबाइलवर अवलंबून आहोत. मोबाइल आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे चुकूनही मोबाइल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास खूप अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक संबंधी माहिती देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही सहज तुमचा हरवलेला iPhone शोधू शकाल. फोनला स्विच ऑफ केल्यानंतरही फोनला ट्रॅक करता येवू शकते, कसं ते जाणून घ्या ट्रिक.

जर तुम्ही कार्यालयात आपला आयफोन विसरला असाल तर फाइंड माय फोन अॅपवरून डिव्हाइसला मॅपवर ट्रॅक करणे खूप सोपे आहे. डिव्हाइस बंद केल्यानंतर सुद्धा हे काम करते. खरं, म्हणजे अॅपल फाइंड माय अॅप क्षमतेचा विस्तार करीत आहे. यावरून यूजर्स आपला हरवलेला आयफोन, आयपॅड किंवा अन्य वस्तूंना एअरटॅगच्या मदतीने सहज शोधू शकतात. परंतु, फंक्शनालिटी केवळ त्याचवेळी काम करते. ज्यावेळी तुमच्याकडे एक कम्पॅटिबल आयफोन आहे. तसेच हे फीचर ऑन आहे.

या आयफोनवर उपलब्ध आहे हे फीचर
या ठिकाणी अशा आयफोन्सची एक लिस्ट दिली आहे. ज्यात हे फीचर काम करते, जाणून घ्या आयफोनची यादी.

हेही वाचा :  अज्ञात जिवाणुमुळे बटाटा पिकाची नासाडी; शास्त्रज्ञदेखील धास्तावले

iPhone 11
iPhone 11 Pro
iPhone 11 Pro Max
iPhone 12iPhone 12 Mini
iPhone 12 Pro
iPhone 12 Pro Max
iPhone 13
iPhone 13 Mini
iPhone 13 Pro
iPhone 13 Pro Max

कसे इनेबल करावे आयफोनचे हे खास फीचर
१. सेटिंगवर जा. आपल्या नावावर टॅप करा.
२. यानंतर Find My ऑप्शनवर टॅप करा.
३. आता Find My iPhone वर ट्रॅक करा. यानंतर समोर टॉगल ऑन करा.
४. यानंतर फाइंड माय नेटवर्क ऑप्शन पाहा. यानंतर याला इनेबल करा. हे तेच फीचर आहे. जे तुम्हाला ऑफलाइन असूनही तुमचा आयफोन शोधण्यास मदत करू शकेल.
५. याशिवाय, सेंड लास्ट लोकेशन ऑप्शन चेक करा. ही बॅटरी कमी झाल्यानंतर तुमच्या आयफोनचे लास्ट लोकेशन तुमच्या अॅपल अकाउंटला पाठवते.

हे फीचर ऑन आहे का, हे चेक करण्यासाठी आपल्या आयफोनला रिस्टार्ट करा. जर तुम्ही पॉवर ऑफ नंतर आयफोन फाइंडेबल मेसेज पाहात असाल तर हे फीचर तुमच्या डिव्हाइसवर इनेबल आहे, असे समजावे.

वाचाः एकच नंबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, फक्त १० रुपयात अनलिमिटेड व्हॅलिडिटी

हेही वाचा :  वर्षभरापूर्वी समुद्रात हरवला होता iPhone, आता हाती लागल्यावर बसला आश्चर्याचा धक्का

वाचा: धक्कादायक! चक्क Apple Watch च्या मदतीने गर्लफ्रेंडवर पाळत ठेवत होता तरूण, पोलिसांनी केले अटक

वाचा: VIP Mobile Number हवाय? ‘या’ साइटवर मिळतायत हटके नंबर्स, जाणून घ्या प्रोसेस

वाचा: २८ नाही तर संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह येतात Jio चे ‘हे’ ५ प्लान्स, किंमत खूपच कमी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …