वर्षभरापूर्वी समुद्रात हरवला होता iPhone, आता हाती लागल्यावर बसला आश्चर्याचा धक्का

मुंबई : Apple iPhones मध्ये अनेक फीचर असतात. वेगवेगळे फिचर्स असले तरी देखील बऱ्याच वेळा कंपनी ही फोनच्या किंमतीवरून ट्रोल होत असते. तरी सुद्धा लग्झरी फील आणि ब्रँड व्हॅल्युमुळे आयफोनची विक्री खूप जास्त आहे. दरम्यान, आता एक रिपोर्ट समोर आला असून त्यात सांगण्यात आलं आहे की आयफोन हा तब्बल 12 महिने म्हणजेच 1 वर्ष पाण्यात राहूनही व्यवस्थीत काम करत होता. 

iPhones हे वॉटर रेसिस्टंट रेटिंगसह येतात. पण, त्यालाही एक मर्यादा आहे. खरंतर, जास्त खोलीचे पाणी आणि जास्त वेळ पाण्यात गेल्यावर आयफोन किंवा इतर कोणत्याही फोनची वॉटर रेझिस्टंट रेटिंग काम करत नाही. वर्षभर समुद्राच्या पाण्यात राहूनही आयफोन सुरक्षित आणि नीट काम करतोय हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. (iphone 8 plus works after 12 months in sea water) 

ही यूकेमधली घटणा असल्याचे म्हटले जात आहे. सन यूकेमध्ये असलेल्या एका रिपोर्टनुसार एका ब्रिटिश महिलेचा iPhone 8 Plus एक वर्षापूर्वी समुद्रात हरवला होता. पण, जेव्हा त्या महिलेला फोन परत मिळाला तेव्हा तिला धक्काच बसला. वर्षभर समुद्रात राहूनही आयफोन 8 प्लस काम करत होता.

हेही वाचा :  वैज्ञानिकांनी मुद्दाम जिवंत केला 50 वर्षांपूर्वी गाढला गेलेला भयंकर ZOMBIE Virus! जाणून घ्या हा किती धोक्याचा?

हेही वाचा : ‘आवड होती म्हणून आणि आता वेड आहे म्हणून…’, Genelia Deshmukh च्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर आला समोर

रिपोर्टनुसार, हा आयफोन 8 प्लस हॅम्पशायरच्या रहिवासी क्लेअर एटफिल्डचा आहे. सुमारे एक वर्षापूर्वी तो समुद्रात हरवला होता. खरंतर ती आयफोनला गळ्यात लटकवत ठेवायची. 2021 मध्ये, जेव्हा ती पॅडल बोर्डिंग करत होती, तेव्हा ती समुद्रात खूप पुढे जाते आणि बोर्डवरून खाली पडली आणि तिच्या गळ्यातून आयफोन खाली समुद्रात पडला. त्यानंतर हा आयफोन ब्रॅडली नावाच्या व्यक्तीला सापडला आणि त्यानं त्या महिलेला याची माहिती दिली. फोन मिळाल्यानंतर त्या महिलेला विश्वास बसेना. जरी आयफोन वॉटरप्रूफ बॅगमध्ये होता. तरीही तो समुद्रात टिकून राहिला.

समुद्रात सापडलेल्या iPhone 8 Plus ची मागील बाजू पूर्णपणे खराब झाली. पण, तरीही तो चालू आहे आणि नीट काम करत आहे. दरम्यान, या वर्षी कंपनीनं iPhone 14 लॉन्च केला आहे. iPhone 8 Plus हा खूप जुना फोन असून कंपनीने तो बंदही केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …