दरमहा २ लाख पगार हवाय? तर ही संधी हातची जाऊ देऊ नका, १५ एप्रिलपूर्वी अर्ज करा

मुंबई : तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड विविध पदांसाठी उमेदवार भरती करत आहे. अभियांत्रिकी, तसेच इतर पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार mmrcl.com या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत साइटवर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 27 पदांची भरती केली जाणार आहे. चला तर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.

रिक्त पदांची माहिती

असिस्टंट जनरल मॅनेजर – ५ पद
असिस्टंट मॅनेजर – २ पद
उप अभियंता – २ पद
कनिष्ठ पर्यवेक्षक – १ पद
कनिष्ठ अभियंता – १६ पद
असिस्टंट (आयटी)  १ पद

यासाठी अर्ज कसा करायचा?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

हेही वाचा :  'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

पात्र उमेदवारांनी इतर आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 येथे पाठवावा.

वयोमर्यादा

33 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी जारी केलेल्या पात्रतेनुसार अर्ज करू शकतात.

वेतन

34 हजार ते 2 लाख रुपये पर्यंत विविध पद आणि पात्रतेनुसार वेतन निश्चित केला जाईल

टीप : भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनेत नमूद केलेली कागदपत्रे तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- ‘डॉक्टर से कम समझे क्या!’

Viral Video : देशातील कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला आजी आजोबासह अनेक चिमुकले पोरं चंदन …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …