‘पावनखिंड’नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत ‘शेर शिवाजी’ | chhatrapati shivaji maharaj digpal lanjekar upcoming movie sher shivraj


सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिग्पाल लांजेकरांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आज पर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. त्यात लवकरच शिवाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट येणार आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटानंतर पावनखिंड हा चित्रपट आणला. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. लवकर दिग्पाल लांजेकर शिवाजी महाराजांवर एक चित्रपट घेऊन येणार आहे. नुकतीच त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे.

दिग्पाल यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘शेर शिवाजी’ आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत “अन्याय निवारण्यासाठी कणाकणांतून बाहेर पडणार, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह… कधी?…… शेर शिवराज. तिथी (दिनांक) कळणार उद्या! हर हर महादेव”, असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच नावं समोर आलं असून चित्रपट प्रदर्शनाची तारिख काय ती अजून कळली नाही. तर चित्रपट प्रदर्शनाची तारिख उद्या घोषित करण्यात येणार आहे.

आणखी वाचा : The Kashmir Files: “मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे…”, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले सत्य

हेही वाचा :  अयोध्येत KFC च्या आऊटलेटचा मार्ग मोकळा; फक्त पाळावी लागेल 'ही' एक अट

आणखी वाचा : “चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दाखवताच…”, विवेक अग्निहोत्रींनी सांगितला शूटिंग थांबवल्याचा किस्सा

दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेला पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली आहे. तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …