…म्हणून काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत CRPF ची गरज भासणार नाही – अमित शाह | CRPF may not be needed in Kashmir in few years says Home Minister Amit Shah


केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत सुरक्षा दलाची गरज भासणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय. ते शनिवारी जम्मूमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध लढ्याबद्दल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी CRPFनं केलेल्या कामाचं कौतुक केलं.

“जम्मू आणि काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येकडील भागात सीआरपीएफ ज्या मेहनतीने  काम करत आहे, मला खात्री आहे की पुढील काही वर्षांत या तिन्ही प्रदेशांमध्ये सीआरपीएफची गरज भासणार नाही. याचे संपूर्ण श्रेय सीआरपीएफला जाईल,” असं अमित शाह सीआरपीएफ जवानांना संबोधित करताना म्हणाले. शिवाय  गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे असं म्हणत त्यांनी कलम ३७० आणि ३५अ रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरच्या लोकांना फायदा झालाय, असं सांगितलं.

कार्यक्रमादरम्यान, दहशतवाद आणि देशभरातील बंडखोर यांच्याशी लढताना प्राण गमावलेल्या सीआरपीएफ जवानांच्या नातेवाईकांना शाह यांच्या हस्ते पदके आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हेही वाचा :  बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …