चार दिवसांत पाचशे नियोजित शस्त्रक्रिया स्थगित!; वैद्यकीय शिक्षकांना आश्वासनाचे पत्र मिळालेच नाही | Five hundred planned surgeries postponed in four days akp 94


राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयातील चार हजार वैद्यकीय शिक्षकांनी बाह्य़रुग्ण सेवेसह सामान्य वार्डातील सेवा बंद केल्या आहेत.

नागपूर : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनंतरही वैद्यकीय संचालक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षकांच्या संघटनेला मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे पत्र दिले नसल्याने शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे.

त्यामुळे रुग्णांचे हाल कायम असून गेल्या चार दिवसांत मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास नियोजित शस्त्रक्रिया स्थगित झाल्या आहेत.

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयातील चार हजार वैद्यकीय शिक्षकांनी बाह्य़रुग्ण सेवेसह सामान्य वार्डातील सेवा बंद केल्या आहेत. या विषयावर दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मुंबईत बैठक घेत संघटनेला काही आश्वासने दिलीत. संघटनेने लेखी आश्वासने मागितल्यानंतर वैद्यकीय संचालकांना तसे पत्र देण्याची सूचना मंत्र्यांनी दिली. परंतु संघटनेला पत्र न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. वरिष्ठ डॉक्टर कामावर न परतल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष वाढत आहे.

दरम्यान, आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने या रुग्णालयांतील रुग्णांचे चौथ्या दिवशीही हाल झाले. येथील सर्व नियोजित शस्त्रक्रिया जवळपास बंद पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयांतील बाह्य़रुग्ण विभागातील रुग्णसंख्याही कमी झालेली दिसत आहे.

हेही वाचा :  आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ

पत्र मिळाल्यावर पुढची दिशा ठरेल

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी संघटनेची सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीचे मिनिट्स किंवा लेखी पत्र वैद्यकीय संचालकांकडून संघटनेला मिळणार होते. अद्याप ते मिळाले नसल्याने आंदोलन कायम आहे. परंतु पत्र मिळाल्यावर याबाबत बैठक घेऊन पुढची दिशा निश्चित केली जाईल.

– डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …