Beauty Tips For Holi : रंगामुळे त्वचा व केसांची होईल भयंकर हालत, जगातल्या सर्वात टॉप ब्युटीशियन शहनाज हुसैनच्या टिप्स होतायत व्हायरल!

देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्त्री-पुरुष असे दोन्ही गट या दिवशी मौजमजा करताना दिसतात व मनोभावे होळीची पुजा करतात. संध्याकाळी छान नटून-थटून तयार होऊन होळी पेटवल्यानंतर सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. यावेळी सर्वत्र गुलाल उडवून व एकमेकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. मात्र, या दिवशी सर्वाधिक परिणाम होत असेल तर तो होतो त्वचेवर. कारण रंग लावल्यामुळे त्वचेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यावर्षी तुम्हीही होळी आणि रंगपंचमी खेळणार असाल तर तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला विसरू नका.आजकाल बाजारात केमिकलयुक्त रंग आणि गुलाल उपलब्ध असल्याने त्वचेला अनेक प्रकारची ऍलर्जी होण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला यापासून त्वचेचा बचाव करायचा असेल तर त्वचेची बेसिक काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तविक शहनाज हुसैन यांनी अशाच अनेक ब्युटी टिप्स शेअर केल्या आहेत ज्या तुमच्यासाठी खास होळी व रंगपंचमीच्या दिवशी उपयुक्त ठरू शकतात. खरं तर, अनेकजण रंग लावण्याआधी हात आणि पायांना मोहरीचे किंवा खोबरेल तेल लावतात. पण हा उपाय पुरेसा नाही. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या केसांची आणि त्वचेची काळजी घेऊ शकता. जाणून घेऊया शहनाज हुसैनच्या खास टिप्स. (फोटो क्रेडिट्स: Istock)

केस आणि त्वचा दोन्हीचे होते नुकसान

होळीच्या दिवशी गुलाल आणि रंग ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारे वापरले जातात. जे तुमचे केस आणि त्वचा दोन्ही खराब करतात. ते केवळ त्वचा आणि टाळूच्या नॉर्मल बॅलन्समध्येच व्यत्यय आणत नाहीत तर यामुळे इतर अनेक प्रकारच्या ऍलर्जी होण्याची देखील शक्यता असते. खाज येणे, पुरळ उठणे, जळजळ होणे, इरिटेशन, कोरडेपणा येणे इत्यादी अनेक समस्या सुरू होतात. त्वचेसोबतच केस आणि टाळूमध्येही ही समस्या दिसून येते. इतकंच नाही तर रंग आणि गुलालामुळे केसांमध्ये गाठी होतात, केस कोरडे व रूक्ष बनतात आणि मधूनच तुटायला लागतात. (फोटो क्रेडिट्स: istock)

हेही वाचा :  सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?

(वाचा :- Celeb Hair Care: हेअरफॉलने अक्षरश: वैतागली होती ही अभिनेत्री, नव-याने सांगितलेले सीक्रेट उपाय वापरताच लांब व घनदाट झाले केस..!)

होळी किंवा रंगपंचमी खेळण्याआधी करा हे काम

जर तुम्ही आज आणि उद्या घराबाहेर होळी खेळायला जाणार असाल तर शक्यतो सूर्यप्रकाशात जाणं टाळा. याशिवाय उन्हापासून हात आणि पायांचे संरक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. यासाठी सनस्क्रीन SPF 20 किंवा 25 लावणे आवश्यक आहे. चेहऱ्याशिवाय हात, पाय, मान, पाठ आणि हात इत्यादींवर सनस्क्रीन लोशन चांगले लावा. (फोटो क्रेडिट्स: pixabay)

(वाचा :- chapati For Skin : शिळ्या चपातीचा करा असा वापर, एका वापरात चेहरा आरशासारखा लख्ख चमकेल व सुरकुत्याही नाहीशा होतील..!)

स्किन सेंसिटिव्ह असेल तर करा हे काम

दुसरीकडे, जर तुमची त्वचा संवेदनशील आणि कोरडी असेल तर प्रथम सनस्क्रीन लावा आणि नंतर काही वेळ प्रतीक्षा करा. काही मिनिटांनंतर चेहरा, हात-पाय, आर्म्स या सर्व अवयवांवर तेल किंवा मॉइश्चरायझर लोशन लावा. याशिवाय ओठांवर सनस्क्रीन असलेला लिप बाम लावा. (फोटो क्रेडिट: फ्रीपिक)

(वाचा :- मेकअप प्रोडक्ट्स विकून दिवसाला करोडो रूपये कमावते ही महिला, कधीकाळी 10,000 ची नोकरी करण्याची आली होती वेळ..!)

हेही वाचा :  धक्कादायक! आजही इथे सख्खे भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भावंड कितीही असो, नवरी मात्र एकच!

रंग व गुलालापासून केसांचा असा करा बचाव

होळी खेळण्यापूर्वी केसांना कंडिशनर किंवा हेअर सीरम लावा. हे केसांचे सूर्यप्रकाशाच्या प्रभावापासून आणि रंगांमुळे होणा-या कोरडेपणापासून संरक्षण करते. सर्वप्रथम हातात थोडे सीरम घ्या आणि तळहातांनी घासून ते पसरवा आणि नंतर केसांना लावा. तुम्हाला हवे असल्यास केसांना फक्त खोबरेल तेल लावू शकता. हे केसांना नुकसान होण्यापासून वाचवेल आणि रंगांपासून सुरक्षित ठेवेल. त्याचबरोबर नखांवर ट्रान्सपरंट नेलपॉलिश लावा. जेणेकरून रंग किंवा गुलाल नखांमध्ये अडकणार नाही. (फोटो क्रेडिट्स: TOI)

(वाचा :- korean beauty : उगाच नाही संपूर्ण जग कोरियन मुलींच्या मादकतेवर घायाळ, काचेसारखी त्वचा मिळवण्यासाठी करतात ‘ही’ कामे!)

दुष्परिणाम टाळण्यासाठी काही नैसर्गिक टिप्स

रासायनिक रंग त्वचेसाठी तसेच केसांसाठी अतिशय हानीकारक ठरत असून त्याला पर्याय म्हणून नैसर्गीक रंगाचा वापर करा. रंगांची गुणवत्ता सुनिश्चित करा. टेसूची फुले, पाने, चंदन पेस्ट, गुलाब पावडर, केशर, हळद, मुलतानी माती आणि इतर नैसर्गिक पदार्थ त्वचेकरिता सुरक्षित पर्याय आहे. कृत्रिम रंगामुळे होणारे नुकसाना टाळण्यासाठी नैसर्गिक पर्यांयाचा वापर करणे उत्तम ठरेल. यासाठी पुढील टिप्स फॉलो करा –

  1. नैसर्गिक रंगांचा वापर करा
  2. त्वचा हायड्रेट ठेवा – ठराविक अंतराने भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या
  3. जास्त काळ ओल्या कपड्यांमध्ये राहू नका. शक्य तितक्या लवकर ओले कपडे बदला
  4. डोळ्यांना रंग आणि सूर्यापासून वाचवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा
  5. वॉटरप्रूफ बँड-एडद्वारे सर्व जखमा बंद करून ठेवा जेणेकरून त्यामध्ये रंग तसेच हानीकारक रसायने जाऊन संसर्ग वाढीस लागणार नाही
  6. केस मोकळे सोडू नका, केस वर बांधा किंवा स्कार्फने झाका
  7. त्वचेचा कोरडेपणा कमी व्हावा म्हणून काही आरामदायी ऑईंटमेंट्स त्वचेला लावा
  8. कोणतेही तीव्र रंग व वास नसलेल्या सौम्य साबणाने त्वचा धुवा
  9. भरपूर पाणी वापरून चेहरा आणि अंग धुऊन काढा
  10. बेबी ऑईलचा वापर करून त्वचा स्वच्छ करा
  11. रंग खेळल्यानंतर किमान 48 तास त्वचा घासू (स्क्रबिंग) नका
  12. त्वचा मऊ ठेवण्यासाठी दही किंवा बेसनासारखे नैसर्गिक घटक वापरा
  13. आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण अंगाला मॉईश्‍चराईझर लावून त्यातील आर्द्रता कायम राहील याची काळजी घ्या
  14. हे सोपे उपाय केलेत तर होळीचा आनंदही लुटता येईल आणि त्वचा निरोगी व मुलायम राखता येईल शिवाय केसांचेही नुकसान होणार नाही.
  15. मुलांचे करोना वॅक्सिनेशन सुरू, वॅक्सिनआधी व नंतर करा ‘ही’ 5 कामे, साइड इफेक्ट्सपासून होईल बचाव
हेही वाचा :  Trending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर...,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral

(वाचा :- Hair Growth : 1 महिन्यात कंबरेपेक्षाही लांब व घनदाट होतील केस, टक्कल पडलेल्या जागीही येतील केस, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुरुषांच्या अंडकोषापर्यंत पोहोचतोय जगातील सर्वात धोकादायक पदार्थ; नष्ट होत नाही की खराब होत नाही

Plastic in Men Testicles : संपूर्ण जगासाठी धोकादाय ठरत असलेला घातक पदार्थ आता  पुरुषांच्या अंडकोषापर्यंत …

मोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

Election Commissions Decision: महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होतंय. आधीच्या 4 टप्प्याप्रमाणे …