‘द कश्मीर फाइल्स नॉनसेन्स चित्रपट आहे’; प्रकाश राज यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

The Kashmir Files: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटावर काही लोकांनी अक्षेप घेतला. ‘कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रोपगंडा आणि वल्गर आहे.’ असं चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) वक्तव्य केलं होतं. आता या चित्रपटावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी टीका केली आहे. एका कार्यक्रमामध्ये प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स हा नॉनसेन्स  चित्रपट आहे.’, असं वक्तव्य केलं. आता या वक्तव्यावर एक ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रकाश राज? 

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश राज हे द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे.  ‘द कश्मीर फाइल्स हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. ते अजूनही निर्लज्ज आहेत. दिग्दर्शक अजूनही सांगत आहे, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’ त्याला भास्कर पुरस्कारही मिळणार नाही.’ 

हेही वाचा :  जगभरातील 300 पेक्षा अधिक सिनेमांच्या यादीत 'Me Vasantrao'चा समावेश!

विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया 

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘द कश्मीर फाइल्स या लोकांच्या चित्रपटानं अर्बन नक्षल असणाऱ्यांची झोप उडवली आहे. त्यांच्यामधील एक पिढी एक वर्षानंतरही त्रस्त आहे, ते प्रेक्षकांना भुंकणारी कुत्री असं म्हणत आहेत. मिस्टर अंधकार राज, मी भास्कर कसा मिळवू शकतो? तो तर तुमच्या आहे आणि तो कायम तुमचाच राहिल.’

‘द कश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे. आता विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हेही वाचा :  'पठाण'च्या त्सुनामीत रितेशचा 'वेड' ठरतोय सुपरहिट! आतापर्यंतची कमाई वाचून व्हाल थक्क

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

The Kashmir Files: ‘द कश्मीर फाईल्स कचरा आहे’; प्रसिद्ध दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …