‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ आला समोर! ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारतोय ध्येय धुरंदर राजकारणी | chandramukhi film actor adinath kothare is in lead role of daulat deshmane


‘चंद्रमुखी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. खरंतर सुरुवातीपासून हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता आणि टिझरनंतर या चर्चांना अधिकच उधाण आलं. त्यात टीझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच ताणली गेली. टीझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे.

महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा ‘दौलत देशमाने’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. आदिनाथचा या चित्रपटातील फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा- शिल्पा शेट्टीच्या कुटुबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

हेही वाचा :  Baloch : मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच'!

चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगताना आदिनाथ कोठारे म्हणतो, ”निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.’

आणखी वाचा- “कपिल शर्माने नकार दिला…”, ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमोशन वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत

आदिनाथ पुढे म्हणाला, ‘ प्रसाद ओक यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. व्यक्तिरेखेबद्दलची प्रतिमा त्यांच्या डोक्यात निश्चित असल्याने समोरच्याकडून अपेक्षित आणि उत्तम अभिनय ते करून घेतात. माझ्या ह्या भूमिकेसाठी मी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगायचे तर, प्रत्येक कलाकाराला कोणतीही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावाच लागतो. तसाच ह्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा, वागण्यातील करारीपणाचा अभ्यास मी नक्कीच केला.’

हेही वाचा :  water taxi service rate from navi mumbai to mumbai will be reduced by rs 80 to 120 zws 70 | जलवाहतुकीचे भाडे कमी होणार

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ‘यापूर्वी मी आदिनाथचे काम पाहिले आहे. त्यामुळे दौलतच्या व्यक्तिरेखेत तो चपखल बसला. त्याने त्याच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. टीझरमध्येच आपल्याला दौलतच्या व्यक्तिरेखेचा अंदाज आला आहे. त्यामुळे पडद्यावर दौलत काय करणार आहे, हे प्रेक्षकांना कळेलच. आता ‘चंद्रमुखी’ समोर यायची आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येईल.’

आणखी वाचा- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. तर या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Silent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..

Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना …

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …