5 लक्षणांवरून समजून जा तुमच्या पतीला रुचत नाही तुमचे यश

आजच्या काळात पुरुषांना नोकरदार महिलांशी लग्न करायचे असते पण जर महिलांनी त्यांच्यापेक्षा जास्त कमावले तर त्यांना ही गोष्ट खूपच जड जाते. आजच्या काळात असे अनेक पुरुष आहेत ज्यांना आपल्यापेक्षा आपली पत्नी जास्त यशस्वी आहे हे मान्य करण्यात वाईट वाटत नाही. पण तरीही अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे. बहुतेक पुरुषांना आजही महिलांना स्वतःपेक्षा खाली ठेवण्याकडे भर देतात. जेणे करून पुरुष स्त्रीवर नियंत्रण ठेवू शकेल.

फ्लोरिडा आणि व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जोडीदाराच्या यशाचा थेट परिणाम पुरुषांच्या आत्मसन्मानावर होतो. त्यामुळे त्यांचे परस्पर संबंधही धोक्यात येऊ लागतात. हे केवळ करिअरमधील यशामुळे होत नाही. कधी कधी पुरुषी आत्मसन्मान धोक्यात येतो. (फोटो सौजन्य :- Istock)

गोष्टी शेअर करत नाहीत

गोष्टी शेअर करत नाहीत

बायको जास्त कमवू लागली की नवऱ्याला कुठेतरी असुरक्षित वाटू लागते. बहुतेक लोक ही भावना थेट त्यांच्या जोडीदाराशी शेअर करत नाहीत. पुरुषांना असुरक्षित भावना निर्माण होते.अशा परिस्थितीत जर तुमचा नवरा तुमचा पगार किंवा सामाजिक जीवन या गोष्टीत तुम्हाला टार्गेट करत असेल तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्याला तुमचा हेवा वाटतो.

हेही वाचा :  आता ब्यूटी पार्लरचे हजारो रुपये वाचणार!, घरच्या घरी अशा पद्धतीने करा 'सॉफ्ट हेयर वॅक्स'

(वाचा :- सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सुधा मूर्तींच्या आईंनी घातली होती ‘ही’ अट, वाचून तुम्हीही २ मिनिटं विचार कराल) ​

तुमच्या स्वप्नांची पर्वा करत नाही

तुमच्या स्वप्नांची पर्वा करत नाही

प्रत्येकाची जीवनाची ध्येये आणि स्वप्ने वेगवेगळी असतात. बहुतेक स्त्रियांना लग्नानंतर या गोष्टी पूर्ण करणे खूप अवघड असते. त्यांच्यासाठी स्वप्नातील घर, पती आणि मुले यानंतरही जर एखाद्या स्त्रीने आपले ध्येय साध्य करण्याचे धाडस केले तर ही गोष्ट तिच्या पतीला फारशी आवडत नाही.

सर्व गोष्टीचा दोष तुम्हाला

सर्व गोष्टीचा दोष तुम्हाला

जर तुमचा नवरा अचानक तुम्हाला टोमणे मारायला लागला किंवा तुमच्या नात्याबद्दल तक्रार करू लागला, तर तो तुमच्या कामाबद्दल आनंदी नाही आहे. अनेक वेळा महिलांना त्यांचे करिअर किंवा लग्न यापैकी एक पर्याय निवडावा लागतो.

प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो

प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो

आपल्या समाजातील बहुसंख्य पुरुषांना स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबत खूप असुरक्षित वाटतं. त्यांना त्यांचे म्हणणे ऐकणाऱ्या महिला आवडतात. नातेसंबंधावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते नेहमी आपल्या पत्नीला घर आणि ऑफिस नीट सांभाळू शकत नाही असे वाटून देतो. किंवा ती किती मूर्ख आहे हे सांगत असतात.

(वाचा :- लग्न करणं खरच महत्त्वाचं आहे का? श्री श्री रविशंकर भन्नाट उत्तर ऐकून अवाक व्हाल) ​

हेही वाचा :  Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले

प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ आहे

प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ आहे

जर तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक गोष्टीचा उलट अर्थ काढत असेल, तर हे लक्षण आहे की त्याला तुमच्या यशामध्ये काहीच रस नाही ही गोष्ट समजून घ्या. उदाहरणार्थ द्यायचे झाले तर जर तुमच्या पतीने तुम्हाला विचारले की तुमचा दिवस कसा होता? याच्या प्रत्युत्तरादाखल जर तुम्ही म्हणाल की आज ऑफिसमध्ये तुमची खूप प्रशंसा झाली, तुमचा खूप आनंद झाला, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्ही त्यांना कमी लेखता.

(वाचा :- 7 वचने सोडा या 7 अतरंगी गोष्टीमुळे लोकांना मिळतो प्रेमात धोका, या देशाने केलेल्या सर्वेमधून चक्रावणारी माहिती समोर) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident : ‘आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि…’ ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि …

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील …