मोत्यांसारख्या चमकदार दातांसाठी करा हे ५ घरगुती उपाय

दरवर्षी २० मार्च रोजी हा दिवस World Oral Health Day म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजर केला जातो. यावर्षी या दिवसाची थीम ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’Be Proud of Your Mouth अशी आहे.
मौखिक आरोग्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. पण मौखिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही असे केले नाहीत तर दातांशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
दातांच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर, दात पिवळे पडणे, हिरड्या दुखणे, दातदुखी, पायोरिया, दुर्गंधी श्वास आणि दात कमकुवत होणे अशा अनेक समस्या खूप त्रास देतात. दात पिवळे पडणे किंवा श्वासाची दुर्गंधी तुमच्यासाठी लाजिरवाणी होऊ शकते. यासाठीच नोएडा येथील’कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’ चे आयुर्वेदिक डॉक्टर कपिल त्यागी यांनी काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने तुम्ही तुमचे दात कसे पांढरे आणि चमकदार बनवू शकता यासाठी काही उपाय सांगितले आहेत. (फोटो सौजन्य :- Istock)

हेही वाचा :  Curd आणि Yogurt मधील फरक तुम्हालाही कळत नाही? जाणून घ्या

दात पांढरे करण्यासाठी उपाय रामबाण उपाय

दात पांढरे करण्यासाठी उपाय रामबाण उपाय

आपल्या आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे दात पांढरे करू शकता. यासाठी बाभळीचा वापर केला जातो. दातांच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे.
या औषधी वनस्पतीमध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत. ते चघळल्याने अँटी-बॅक्टेरियल घटक बाहेर पडतात, जे तोंडाचे आरोग्य सुधारतात. आयुर्वेद बाभळीच्या फांद्या टूथब्रश म्हणून वापरण्याचा सल्ला देतो. बाभूळमध्ये आढळणारे टॅनिन दात पांढरे करतात.

वडाची फांदी

वडाची फांदी

वडाचा फांडीचा वापर तुम्ही दात साफ करण्यासाठी देखील करू शकता. वडाची मुळे तुरट असतात जी केवळ दात पांढरे करत नाहीत तर दात आणि हिरड्यांचे आरोग्य देखील सुधारतात.

(वाचा :- ‘या’वेळात शेंगदाणे खाल्ल्यास वजन झरझर कमी होईल, कसं ते जाणून घ्या… )

बहुगुणी तुळशीचा उपाय आहे

बहुगुणी तुळशीचा उपाय आहे

तुळशीचा अनेक प्रकारे आपण वापर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी तुळशीची पाने सुकवून त्याची पावडर बनवा आणि दात घासण्यासाठी वापरा. तुळशीची हिरवी पाने दातांची स्वच्छता सुधारतात आणि दात पांढरे होतात. हे पायोरिया सारख्या दंत समस्यांवर देखील उपचार करू शकते.

(वाचा :- काही केल्या वजन कमी होत नाहीये? तज्ज्ञांनी सांगितलेले Weight loss Soup ट्राय करा १५ दिवसात रिझल्ट येईल) ​

हेही वाचा :  WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपची जादुई ट्रिक! समोरच्यानं डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार

कडुनिंबचा वापर​

कडुनिंबचा वापर​

पांढरे निरोगी दात मिळविण्यासाठी कडुलिंब हा पारंपारिक उपाय आहे. कडुनिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय टूथब्रश म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात जे श्वासाची दुर्गंधी रोखतात, दातांमध्ये उपस्थित जंतू नष्ट करतात आणि पोकळीसारख्या गंभीर समस्यांवर उपचार करतात.

श्वासाच्या दुर्गंधीवर त्रिफळा

श्वासाच्या दुर्गंधीवर त्रिफळा

तुम्ही दात पांढरे करण्यासाठी आणि तोंडी किंवा हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्रिफळा वापरू शकता. त्यामुळे तोंडाचे व्रण कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी त्रिफळा पाण्यात अर्धे राहेपर्यंत उकळवा. थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर या पाण्याने स्वच्छ धुवा.
(टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …