तळलेल्या पुरीत दिसतंय तेल? ऑईल फ्री पुरी दिसण्यासाठी वापरा कमालीच्या ट्रिक्स

स्पेशल दिवस आणि स्पेशल जेवण हे समीकरण कमालीचे आहे. त्यातही मराठमोळे सण असो अथवा लग्न आपल्याकडे पुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकंच काय पण घरात कधी कधी रविवारीही पुरी खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण बरेचदा पुरी तळताना त्यात तेल भरते आणि मग ती खाणे योग्य ठरत नाही. पण असे नक्की का होते. तर पुरीचे पीठ न मळल्यामुळे आणि कणीक नीट न भिजवल्याने ही परिस्थिती उद्भवते. आम्ही तुम्हाला इथे काही सोप्या आणि कमालीच्या ट्रिक्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही Oil Free पुरी बनवू शकता. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​पुरीत तेल का भरतं?​

​पुरीत तेल का भरतं?​

बरेच जण पुरीत तेल भरतं म्हणून पुरी बनवतच नाहीत तर काही जणांना या गोष्टींचा खूपच त्रास होतो. विशेषतः ज्यांना गरमागरम पुरी खायला आवडते. पण तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरून यातून सुटका मिळवू शकता. पुरीची कणीक नीट न भिजवल्याने या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र आजीच्या बटव्यातील या ट्रिक्स तुम्हाला मदत करतील. पुरीची कणीक भिजवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा :  Kitchen Hacks : 20 रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी...तेही तवा, कढई वापरून घरच्या घरी...

​अशी भिजवा पुरीसाठी कणीक​

​अशी भिजवा पुरीसाठी कणीक​
  • सर्वात महत्त्वाचे पुरीची कणीक भिजवताना यामध्ये तुम्ही तुपाचे वा तेलाचे मोहन घालू नये. मोहन घातल्याने पुरीमध्ये सहसा तेल भरते
  • याशिवाय पुरीचे पीठ हे पोळीच्या पिठापेक्षा अधिक घट्ट भिजवावे लागते. कणीक मऊ भिजली तर पुरीमध्ये तेल हमखास भरते
  • पीठ भिजवताना गरम पाण्याचा वापर करू नये

(वाचा – पुरणपोळी होतेय का वातड, अशी बनवा मऊसूत पुरणपोळी आणि साजरी करा होळी)

​पुरी लाटताना गोळा चपटा करू नका​

​पुरी लाटताना गोळा चपटा करू नका​

पुरीत तेल जायला नको असेल तर ही चूक अजिबात करू नका. बरेच जण पुरीचा गोळा हा चपटा करून घेतात आणि मग लाटतात. यामुळे पुरी न फुगता त्यात तेल भरते. त्यामुळे पुरी लाटताना गोळा अजिबात चपट करून घेऊ नका.

(वाचा -चपातीची कणीक मळाल अशी, तर पोळ्या कधीच होणार नाहीत कडक आणि चिवट, सोप्या ट्रिक्स)

​पुऱ्या झाकून ठेवा​

​पुऱ्या झाकून ठेवा​

तुम्ही जर आधी पुऱ्या लाटून घेऊन मग तळणार असाल तर लक्षात ठेवा पुरीचे पीठ पटकन सुकते. त्यामुळे पुऱ्या लाटून झाल्यावर त्या वरून कापडाने झाकून ठेवा आणि मग तळा. म्हणजे पुरी तळल्यावर त्यात कोरडेपणा येऊन तेल भरणार नाही.

हेही वाचा :  क्रुरता! सासुने सुनेच्या बांगड्या फोडल्या, नंतर तोंडात कोंबून डोकं भिंतीवर आपटलं

​क्रिस्पीपणासाठी मिक्स करा रवा वा तांदूळ पीठ​

​क्रिस्पीपणासाठी मिक्स करा रवा वा तांदूळ पीठ​

तुम्हाला जर पुरी अजिबात तेलकट नको असेल आणि क्रिस्पी हवी असेल तर गव्हाचे पीठ भिजवताना त्यात रवा अथवा तांदळाचे थोडे पीठ तुम्ही मिक्स करून भिजवा. यामुळे पुरीत तेल जाणार नाही आणि त्याशिवाय पुरी अत्यंत खुसखुशीत आणि क्रिस्पी होईल.

​ही ट्रिक सर्वात महत्त्वाची​

​ही ट्रिक सर्वात महत्त्वाची​

पुरी तळणे हे सर्वांनाच जमते असं नाही. ही ट्रीक सर्वात महत्त्वाची आहे. तेल पूर्ण तापल्याशिवाय कधीही पुरी तळू नये. तसंच गॅसची आंच मंद ठेऊन पुरी तळल्यास, त्यात नक्कीच तेल भरेल. गॅस फ्लेम अधिक ठेऊनच पुरी तळावी आणि योग्य पद्धतीने तुम्ही स्पीडमध्ये ही तळून घ्यावी.

आम्ही सांगितलेल्या या सोप्या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. त्यामुळे आता पुरी करताना या टिप्स वापरा आणि खा मऊ, खुसखुशीत आणि ऑईल फ्री पुरी!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …