मोदी बायडन यांना ज्या चक्राबद्दल समजावत होते ते आहे तरी काय तुम्हाला माहितीये का? Video पाहून व्हाल थक्क

G20 Summit PM Narendra Modi Backdrop Wheel: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नवी दिल्लीमधील प्रगती मैदान येथे असलेल्या भारत मंडपम या ऑडिटोरियममध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशातील नेत्यांचं स्वागत केलं. यामध्ये अमेरिकेच पंतप्रधान जो बायडन, ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासहीत जपान, इजिप्त, तुर्की, फ्रान्सच्या प्रमुख नेत्यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांनी प्रत्येक नेत्याशी हस्तांदोलन करुन त्यांचं या परिषदेमध्ये स्वागत केलं. या सभेसाठी जी-20 देशांच्या नेत्यांबरोबरच आफ्रिकन देशांच्या संघटनेमधील देशही सहभागी झाले आहेत. या देशांना जी-20 चं स्थायी सदस्यत्व प्रदान करण्यात आलं आहे. मोदी सर्व नेत्यांचं स्वागत करण्यासाठी ज्या ठिकाणी उभे होते त्यामागे एक मोठ्या आकाराच्या चक्राची प्रतिकृती होती. या प्रतिकृतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मोदींनी हे चक्र नक्की काय आहे याबद्दलची माहिती बायडन यांनी सविस्तरपणे दिली. अगदी प्रसारमाध्यमांच्या कॅमेराकडे पाठ करुन हे दोन्ही नेते या चक्राबद्दल गप्पा मारत होते. पण अगदी जागतिक परिषदेमध्ये चर्चेचा विषय ठरलेलं हे चक्र नेमकं काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही? चला आम्ही तुम्हाला सांगतो हे नक्की आहे तरी काय…

हेही वाचा :  The Kerala Story पाहून तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांना सांगितले प्रियकराचे कारनामे

कुठलं आहे हे चक्र?

जी-20 परिषदेत अनेक नेत्यांचं लक्ष वेधून घेणारं हे चक्र सौर घड्याळ आहे. हे मूळ चक्र ओडिशामधील पूरी येथील कोणार्क मंदिरातील (Konark Sun Temple) आहे. हे मंदिर सूर्यदेवेला समर्पित आहेत. या ठिकाणचं नावच कोण आणि अर्क या 2 शब्दांपासून तयार झालेलं आहे. अर्क म्हणजे सूर्य आणि कोणचा अर्थ किनारा असा होतो. हे मंदिर गंगा राजवटीमधील सरंजामशाहीच्या कालावधीमध्ये नृसिंह देवाने इसवी सन पूर्व 1236 ते 1264 दरम्यान बांधलं आहे. हे मंदिर युनिस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्सपैकी एक आहे. या मंदिराचं बांधकाम कलिंग शैलीमधील आहे.

कोणार्क मंदिरात सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर विराजमान असल्याचं दिसून येतं. या संपूर्ण मंदिराची जागा 7 घोड्यांनी घेरलेल्या बार चंद्रांच्या जोड्यांनी बनवलेली आहे. हे मंदिर पुरी पासून 35 किमी तर भुवनेश्वर पासून 65 किमी दूर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी एकूण 12 चाकं आहेत. ही चाकं खरं तर सौर घड्याळं आहेत. प्रत्येक वर्तुळ 8 भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. हे सौर घड्याळ काम कसं करत यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा >> विमानातील तो खास क्षण, ‘जय सिया राम’ म्हणत स्वागत अन्… ऋषी सुनक, अक्षता मुर्तींचे भारतातील Photos Viral

या घड्याळाच्या आधारे कसा मोजतात वेळ?

सौर घड्याळ हे साध्या घड्याळाच्या उलट दिशेनं काम करतं. सूर्य पूर्वीकडे उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळत असेल तर सावलीही उलट्या दिशेने जाणार. त्यामुळेच हे घड्याळ उलट्या बाजूने काम करतं. म्हणजे कालमापनासाठी या घड्याळामध्ये डावीकडून उजवीकडे जावं लागतं. या घड्याळामध्ये आठच आऱ्या आहेत. प्रत्येक आरी ही 3 तासांचा कालावधी दाखवते. या कालावधीला अष्टप्रहर म्हणतात. म्हणजे दिवस एकूण आठ प्रहरांमध्ये विभागण्यात आलेला असता. 8X3 = 24 तास असा हा सरळ हिशेब आहे. 2 मुख्य आऱ्यांच्या मधील वेळ अर्धा अर्धा वाटण्यासाठी दीड तासांच्या हिशोबाने मध्ये एक छोट्या आकाराची आरीही दिसून येते. तसेच मिनिटंही या घडळ्याळात कळतात.

हेही वाचा :  UP Election : “अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं असेही म्हटले होते पण…”; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

पाहा व्हिडीओ >> भारतात G20 साठी आलेल्या ‘या’ नेत्याने विमानातून उतरतानाच एक डोळा झाकला कारण…

अष्टप्रहार दर्शवणाऱ्या या सौरचक्राच्या 2 आऱ्यांमधील 60 छोटे छोटे गोळे एका वेगळ्या चक्रावर दर्शवण्यात आले आहेत. हा प्रत्येक छोटा गोळा 3 मिनिटांचा कालावधी दर्शवतो. 

ही संपूर्ण रचना स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. तुम्हाला या घड्याळाबद्दल आधी माहिती होतं का? कमेंट करुन नक्की सांगा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …