या वीकेंडला हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहा ओटीटीवर

Ott Web Series And Movies:  ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. ओटीटी रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. या वीकेंडला काही खास चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात. 

लॉस्ट (Lost)

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित लॉस्ट या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. यामी गौतमने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा उत्कृष्ट चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी  झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


 

अ गर्ल अँड एन अॅस्ट्रोनॉट (A Girl and an Astronaut)

अ गर्ल अँड एन अॅस्ट्रोनॉट ही वेब सीरिज 17 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना एक खास लवस्टोरी बघता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता. 

हेही वाचा :  Suman Kalyanpur : तलत महमूद यांनी गाणं ऐकलं अन् सुमन कल्याणपूर यांचा संगीतप्रवास सुरू झाला...

लकी लक्ष्मण (Lucky Lakshman)

लकी लक्ष्मण या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.2 एवढे रेटिंग मिळाले आहेत. टॉलिवूडचा हा चित्रपट अहा (Aha) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 17 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 

कार्निव्हल रो 2(Carnival Row 2)

कार्निव्हल रो 2 ही सीरिज 15 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आली. कार्निव्हल रो-2 च्या पहिला सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कार्निव्हल रो 2 सीरिज पाहू शकता. 

 

वाळवी

8.8 एवढे आयएमडीबी रेटिंग असलेली ‘वाळवी’ ही सर्वोच्च रेटिंग प्राप्त झालेली मराठी फिल्म आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या फिल्मला सारखीच दाद दिली. अनन्यसाधारण पटकथा, अनपेक्षित धक्के, वळणे आणि अभिनेत्यांची दमदार कामगिरी यांमुळे ही फिल्म प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली.  24 फेब्रुवारी 2023 पासून बघा ‘वाळवी’ झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …