ऑनलाईन लग्न जुळलं! लग्नानंतर गुगलवर पत्नीबद्दल माहिती शोधली… रिझल्ट पाहून पतीला बसला धक्का

Trending News : लग्नासाठी एका तरुणाने मॅट्रिमोनिअल साईटवर (Matrimonial Site) जाऊन मुलगी शोधली. मुलीची आवड-निवड आणि बरेचसे गुण मिळत असल्याने तरुणाने त्या मुलीशीच लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला. मुलीनेही त्याला होकार दिला आणि दोघांचं धुमधडाक्यात लग्न झालं. पण लग्न झाल्यानंतर त्या मुलीने आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात केली. तिच्या वागण्या-बोलण्याचा संशय आल्याने तिच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाटी गुगलवर (Google) तीचं नाव सर्च केलं. यात जी माहिती समोर आली ती पाहून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. 

लग्नासाठी ऑनलाईन शोधली मुलगी
गुजरातमधल्या पोरबंदर (Gujarat Porbandar) इथं राहणारा एक तरुण लग्नासाठी मॅट्रिमोनिअल साईटवर अनुरुप मुलीच्या शोधात होता. एका साईटवर त्याने रेखा दास नावाच्या मुलीचा प्रोफाईल पाहिला आणि त्याला ती आवडली. त्याने तिला फोनवरुन संपर्क साधल आपण लग्नासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं. मुलीनेही फारसे आडेवेडे न घेता लग्नाला होकार दिला. त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांच्या संमतीने दोघांचं लग्नही झाली. पण खरी गम्मत लग्नानंतर सुरु झाली.

रेखा दासने दिली खोटी माहिती
रेखा दासने (Rekha Das) त्या तरुणाला आपण खूपच गरीब घरातील असून धार्मिक विचारांची असल्याचं सांगितलं. लग्नानंतर दोघंही पोरबंदरला म्हणजे तरुणाच्या घरी आले. पण सासरी आल्यावर ती तरुण अत्यंत महागडे कपडे (Expensive Clothes) आणि महागडे कॉस्मेटिक (Expensive Cosmetics) वापरत असल्याचं त्या तरुणाच्या लक्षात आलं. तरुणाला हे सर्व विचित्री वाटलं, पण सुरुतीला काही दिवस त्याने याकडे कानाडोळा केला. 

हेही वाचा :  "तुमची लादी मजबूत आहे," चोरांनी चक्क नाल्यातून सोन्याचं दुकान लुटलं; मागे सोडली चिठ्ठी, वाचा नेमकं काय घडलं?

नॉनव्हेज खायची, फिरायला गेल्यावर बीअर मागवायची
तरुणाचं कुटुंब शाकाहरी होतं, पण रेखाला मांसाहरी पदार्थ आवडायचे. मांसाहरी खाण्यावर तरुणाचा कोणताही आक्षेप नव्हता. पण प्रोफाईलमध्ये तीने आपलं कुटुंब शाकाहरी असल्याची नोंद केली होती. पण प्रकरण इथेच थांबत नाही तरुण आणि रेखा दास जेव्हा माऊंट आबूला फिरण्यासाठी गेले तेव्हा तिने हॉटेलमध्ये बिअर मागवली. 

असा झाला पर्दाफाश
काही दिवसांनी रेखाच्या आईच्या तिला फोन आला, जमिनीच्या एका प्रकरणात आईने तिला आसामला बोलावलं. यावर त्या तरुणाने रेखा दासला एक नवा मोबाईल, 5 हजार रुपये रोख आणि एटीएम कार्ड ज्यात 50 हजार रुपये होते, रेखा दासला दिले. रेखा आसामला गेल्यानंतर तिथल्या कोर्टाची त्या तरुणाच्या घरी नोटीस आली. त्यात रेखा दासवर काही गुन्हांची नोंद असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. इतकंच नाही तर तिचं नाव रेखा दास नाही तर रेखा चौहान असं लिहिण्यात आलं होतं. 

तरुणाने गुगलवर सर्च केलं नाव
रेखा चौहान आणखी काही माहिती मिळतेय का हे तपासण्यासाठी त्या तरुणाने तिचं नाव गुगलवप सर्च केलं. सर्चमध्ये समोर आलेली माहिती पाहून त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्याने आपलं लग्न रद्द करण्यासाठी पोरबंदर मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका केली. 

हेही वाचा :  अग्रलेख : होरपळ आणि हिरवाई..

गुगलमध्ये काय माहिती होती
रेखा चौहान ही चक्क एक लेडी डॉन आहे. आसाममध्ये मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत तिचं नाव असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.  5 हजार गाड्यांची चोरी, दरोडे, हत्या आणि गेंड्याच्या शिकारीप्रकरणी रेखा चौहानचा पोलीस शोध घेत आहेत. रेखा चौहान हिच्याविरोधात आसाम कोर्टाने वॉरंटही जारी केलं आहे. सध्या पोरबंदर पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …