‘या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय’ हिम्मत असेल तर… आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Abdul Sattar) यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला होता. तसंच आदित्य ठाकरे यांचा रणछोडदास असंही म्हटलं होतं. आता आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं आहे. कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणतात, मी असे छोटा पप्पू, मला नाव ठेवा पण जनतेची कामं करा, या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज
तसंच आदित्य ठाकरे यांनी ओपन चॅलेंजही दिलं आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि 40 गद्दारांनी राजीनामा द्यावेत, होऊन जावू द्या, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) विजयी झाल्याने आता आमचे 16 आमदार झाले आहेत. 40 गद्दार आमदार पळून गेलेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री कोण ते समजत नाही, गद्दारचा शिक्का कपाळावर घेऊन ते फिरतायत असं सांगत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. 

हेही वाचा :  Satyajit Tambe News: सत्यजित तांबे प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उच्च शिक्षण घेतलेल्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह

‘दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खूर्ची खाली करा’
शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्ज आमच्या सरकारने माफ केली. राज्यात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, मला शेतातील जास्त कळत नाही, पण शेतकऱ्यांचं दु:ख कळतं, उद्धवजी असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता असं सांगत आदित्य ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खूर्ची खाली करा अशी मागणी केली. राज्यात अजूनही शेतीचे पंचनामे झालेले नाहीत, दिवाी शिधा वाटपातही घोटाळा झाला असून त्यावरही आम्ही आवाज उठवणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तारांच्या त्या वक्तव्याचा निषेध
काही महिन्यातच हे सरकार कोसळणार, लवकरच निवडणुका लागणार आहेत, तयार राहा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंविषयी वापरेला शब्द अत्यंत घाणेरडा आहे. केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …