हिवाळ्यात सहज आणि स्वस्तात मिळणाऱ्या या भाजीमुळे टाळता येतो Cancer, Diabetes आणि BP चा त्रास, मिळतील इतरही फायदे

ऋतुमानानुसार कायमच आहारत बदल करणे गरजेचे असते. याचा फायदा सुदृढ आरोग्यासाठी होतो. थंडीत मिळणारी एक भाजी शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. ती भाजी म्हणजे मुळा. मुळा या भाजीत अनेक फायदे लपलेले आहेत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील साखर आणि उच्च रक्तदाब या दोन्हीवर परिणाम होऊ शकतो.

पुरस्कार विजेते पोषणतज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, मुळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसे, ही एक सामान्य भाजी आहे. जी भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाते. पण मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. जे बद्धकोष्ठतेपासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करू शकतात. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

मुळा खाल्यामुळे होतात अद्भूत फायदे

​मुळ्यात असतात असंख्य पोषकतत्व

Webmd नुसार, मुळा हे कॅटेचिन, पायरोगॅलॉल, व्हॅनिलिक ऍसिड आणि इतर फिनोलिक संयुगे यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. या मूळ भाजीमध्ये व्हिटॅमिन सी देखील चांगले असते. जे तुमच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

हेही वाचा :  '6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा...'; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन

​मुळ्यात असतात एँटी कॅन्सर गुण

तज्ज्ञांच्या मते मुळासारख्या क्रूसीफेरस भाज्या खाल्ल्याने कर्करोग टाळता येऊ शकतो. एका अभ्यासानुसार, क्रूसिफेरस भाज्यांमध्ये संयुगे असतात जे पाण्यात मिसळल्यावर आयसोथियोसायनेटमध्ये मोडतात. आयसोथियोसायनेट्स कर्करोगास कारणीभूत पदार्थ शरीरापासून दूर ठेवण्यास आणि ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. यामुळे तुम्ही अगदी सुरूवातीपासूनच कर्करोगाचा धोका टाळू शकता.

​डायबिटिजला कंट्रोल करतो मुळा

मुळ्यामध्ये असलेल्या अँटी-डायबेटिक गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ग्लुकोज वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच यामध्ये असलेले अॅडिपोनेक्टिन हार्मोन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. ज्यामुळे तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो. याव्यतिरिक्त, मुळ्या मध्ये बायोएक्टिव्ह संयुगे असतात जे अॅडिपोनेक्टिनचे समायोजन करतात आणि ग्लूकोज होमिओस्टॅसिसचे नियमन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

​मुळ्यामुळे पचनशक्ती सुधारते

फूड एक्सपर्ट स्पष्ट करतात की मुळ्यामध्ये विरघळणारा आणि न विरघळणारा फायबरचा कॉम्बो आहे. जे तुमच्या GI ट्रॅक्टसाठी उत्तम आहे. फायबर तुमची आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कार्य करते.

​ब्लड प्रेशर राहतो नॉर्मल

मुळा पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे कार्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो. त्यात अँथोसायनिन्स नावाची संयुगे देखील असतात ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. आणि रक्तदाब कमी करण्यास मदत हो

हेही वाचा :  Teachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …