World TB Day 2023: टीबीचा आजार ठरतोय प्राणघातक, लवकर निदान होणे गरजेचे

एक हजार वर्षांपेक्षाही अधिक काळापासून मानवाला टीबीचा आजार होत आहे. कोविड-१९ ने जागतिक आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण केला, त्यापाठोपाठ जगातील दुसरा सर्वात जास्त भयंकर संसर्गजन्य आजार टीबी आहे. मानवासाठी सर्वाधिक प्राणघातक ठरत असलेल्या आजारांच्या यादीत कोविड-१९ पाठोपाठ टीबीचा क्रमांक आहे

आज जगभरात दर मिनिटाला ३ व्यक्ती टीबीमुळे आपले प्राण गमावत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२२ ग्लोबल टीबी अहवालाच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये जवळपास १०.६ मिलियन लोक टीबीमुळे आजारी पडले असे अनुमान आहे. २०२० च्या तुलनेत हा आकडा ४.५% नी जास्त आहे. २०२१ मध्ये १.६ मिलियन व्यक्ती टीबीमुळे मृत्युमुखी पडल्या. आफ्रिका व आग्नेय आशियातील विकसनशील देशांमध्ये टीबीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. टीबीचा आजार वाढण्याच्या दराच्या संदर्भात इतर देशांच्या तुलनेत भारतात प्रमाण खूप जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षी टीबीच्या २.८ मिलियन नवीन केसेस नोंदवल्या जातात असे अनुमान आहे. यासंदर्भात डॉ. व्ही. रवी, व्हायरॉलॉजिस्ट, हेड – रिसर्च अँड डेव्हलपमेंट, टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

टीबीचा झालाय लक्षात येण्याच्या मार्गातील अडथळे

टीबीचा झालाय लक्षात येण्याच्या मार्गातील अडथळे

टीबी ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे. टीबीचा आजार झालेल्या व्यक्तींची संख्या आणि हा आजार झाला आहे हे लक्षात येऊन ते नोंदवले गेलेल्या केसेसची संख्या यांच्यातील वाढते अंतर हे यामागचे कारण आहे.
लिंग असमानतेशी संबंधित सामाजिक-सांस्कृतिक अडथळ्यांमुळे टीबीचे निदान होऊन त्यासाठी आवश्यक काळजी व उपचार घेतले जाणे यावर प्रचंड परिणाम होतो. रोगाविषयी पुरेशी आणि योग्य ती माहिती नसणे, सामाजिक कलंकाची भीती यामुळे अनेक व्यक्ती टीबीची लक्षणे लपवतात. सहाजिकच आजाराचे निदान होण्यास उशीर होतो.

हेही वाचा :  Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

पुरूषांचे प्रमाण जास्त

पुरूषांचे प्रमाण जास्त

संशोधनातून असे दिसून आले आहे की, ज्यांना टीबी झाला आहे असे निदान करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाण दर २.४ पुरुषांमध्ये फक्त १ इतकेच आहे. महिलांना टीबीची लक्षणे समजून घेणे शक्य नसल्याने आजार फार गंभीर रूप धारण करत नाही तोवर त्या डॉक्टरकडे जात नाहीत.

जागरूकतेचा अभाव, टीबीसाठी आवश्यक असलेली काळजी पुरेशा प्रमाणात घेतली न जाणे, औषधे न घेणे, औषधांवर पुरेसे लक्ष न ठेवले जाणे आणि औषधांचे विपरीत परिणाम होत असल्यास त्यावर नीट उपाय न केले जाणे अशा अनेक कारणांमुळे टीबी केसेसचा दर सातत्याने वाढत आहे.

(वाचा – Black Water नक्की काय आहे? डायबिटीजपासून ते वजन कमी करण्यापर्यंत जबरदस्त फायदे)

जागरूकता गरजेची

जागरूकता गरजेची

ड्रग सससेप्टीबिलिटी टेस्टिंग कमीत कमी वेळात केले जावे यासाठी देशात रोगनिदानासाठीच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. छातीचे एक्सरे मिळू न शकल्याने आजाराचे निदान करण्यात उशीर होतो आणि चुकीचे उपचार केले जातात. देशातून टीबीचे लवकरात लवकर उच्चाटन करण्यासाठी जागरूकता आणि माहितीशी संबंधित अडथळ्यांविषयी संवेदनशीलता असणे महत्त्वाचे आहे.

(वाचा – Bird Flu Outbreak: बर्ड फ्लू ची कारणे, लक्षणे आणि उपाय )

आजाराचे निदान लवकरात लवकर गरजेचे

आजाराचे निदान लवकरात लवकर गरजेचे

टीबीचा प्रसार रोखण्यासाठी आजाराचे निदान लवकरात लवकर आणि अचूक झाले पाहिजे. टीबी अप्रकट स्वरूपात असतो किंवा सहज समजून येतो. अप्रकट स्वरूपातील टीबीमध्ये रुग्णाची रोगप्रतिकार क्षमता जोवर कमजोर होत नाही तोवर काहीच लक्षणे दिसून येत नाहीत आणि आजाराचे रूपांतर सक्रिय टीबीमध्ये होते जो अतिशय संसर्गजन्य असतो.

ज्यांना सक्रिय टीबी होऊ शकतो अशा व्यक्तींचा आजार लवकरात लवकर शोधून काढून त्यावर तातडीने उपचार केले गेले पाहिजेत, जेणेकरून आजाराचा प्रसार होण्यास आळा घातला जाऊ शकतो.

हेही वाचा :  जादूटोण्याच्या संशयावरून अंगावर अ‍ॅसिड टाकून जीव घेतला; जालना येथील धक्कादायक प्रकार

(वाचा – पोट आणि कमरेवरील हट्टी चरबी करेल कमी जास्वंदीचा चहा, काय सांगतात डाएटिशियन )

थुंकीचा घ्यावा नमुना

थुंकीचा घ्यावा नमुना

थुंकीचे नमुने घेऊन स्मीअर मायक्रोस्कोपी आणि कल्चरद्वारे त्यांची तपासणी करण्याच्या पारंपरिक पद्धती लांबलचक आणि वेळखाऊ आहेत. या पद्धतींमुळे उपचारांना उशीर होतो, आजार पसरत जाण्याचा धोका व आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते. आधुनिक मॉलिक्युलर डायग्नोस्टिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टीबीचे निदान करण्यात सुधारणा होऊ शकते.

प्रयोगशाळांच्या क्षमता मजबूत केल्याने टीबीची काळजी घेण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणता येऊ शकते, तपासणीचे अहवाल अवघ्या काही तासांमध्ये मिळू शकतात आणि रुग्णावरील उपचार लवकरात लवकर सुरु करता येऊ शकतात. टीबी झाला आहे हे लवकरात लवकर लक्षात आल्यास संसर्ग पसरण्याचा दर कमी करता येऊ शकतो.

टीबीसाठी मॉलिक्युलर तपासण्यांचे लाभ

टीबीसाठी मॉलिक्युलर तपासण्यांचे लाभ

हल्लीच्या काही वर्षात टीबीसाठी डीएनए टेस्ट्स केल्या जाऊ लागल्या आहेत, ज्यामुळे आजाराचे निदान लवकरात लवकर केले जाऊ शकते. या तपासणीमुळे मायकोबॅक्टेरियाम ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरियाचे डीएनएचे तुकडे असल्यास आढळून येतात व टीबीचा संसर्ग झाल्याचे पटकन लक्षात येऊ शकते.

  • या तपासण्या अतिशय अचूक असतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या थुंकीमध्ये किंवा शरीरातील इतर द्रवांमध्ये टीबीचे जंतू आहेत किंवा नाहीत हे पटकन लक्षात येऊ शकते
  • औषधांना दाद न देणाऱ्या टीबी प्रकारांना ओळखण्यात डीएनए तपासण्या खूप उपयोगी ठरतात. हल्ली हे प्रकार सर्रास आढळून येत आहेत
  • मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स टेस्ट्स सर्वत्र उपलब्ध झाल्यास, औषधांना दाद न देणाऱ्या टीबीसहित सर्व टीबी ओळखू येण्याच्या सुविधेचा प्रसार होईल
  • मॉलिक्युलर टेस्ट्समुळे तपासण्यांचे अहवाल खूप कमी वेळात मिळतील, उपचार वेळेत सुरु करता येतील

टीबीवरील उपचार

टीबीवरील उपचार

टीबीवरील उपचारांमध्ये आयसोनियाझिड, रिफाम्पिसिन, एथाम्बुटोल आणि पायराझिनामाइड सारख्या औषधांचा समावेश असतो. आजार यशस्वीपणे बरा व्हावा आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपचारांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे खूप आवश्यक आहे.

हेही वाचा :  पुरुषांनो केसांची काळजी घेताना फॉलो करा या 5 बेसिक गोष्टी, टक्कल सोडा केस गळणार देखील नाही

तसे न केल्यास अँटिबायोटिक्सना (प्रतिजैविके) दाद न देणारे जिवाणू टिकून राहतात, त्यामुळे औषधांना दाद न देणारे प्रकार निर्माण होतात. डीएनए तपासण्यांमुळे रक्तप्रवाहात फिरणाऱ्या जीवाणूंमधून डीएनए पातळीचे निरीक्षण करून डॉक्टर औषध उपचारांच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेऊ शकतात.

२०२५ सालापर्यंत भारत टीबी मुक्त

२०२५ सालापर्यंत भारत टीबी मुक्त

२४ मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनाचा विषय आहे – “हो! आपण टीबीचे उच्चाटन करू शकतो” सामूहिक शक्तीचा वापर करून २०३० सालापर्यंत टीबीचे समूळ उच्चाटन केले जाऊ शकते आणि अशाप्रकारे एसडीजी (SDG) उद्दिष्ट्ये पूर्ण केली जाऊ शकतात. ज्या व्यक्तींना टीबी होण्याचा धोका सर्वात जास्त आहे, उदाहरणार्थ, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर आहे अशा व्यक्तींची टीबी तपासणी नियमितपणे करून घेतली पाहिजे.

डीएनए तपासण्यांसह, टीबी तपासण्या उपलब्ध आहेत आणि त्यामुळे टीबीचा आजार पटकन लक्षात येऊ शकतो, उपचार लवकरात लवकर सुरु केले जाऊ शकतात. सार्वजनिक व खाजगी क्षेत्राने समन्वयपूर्वक काम केल्यास, आपण प्रधान मंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो आणि २०२५ सालापर्यंत भारतातून टीबीचे समूळ उच्चाटन होऊ शकते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …