World Population Report : जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात, चीनला टाकलं मागे… पाहा किती फरक

World Most Population Country: जगातील सर्वाधिक लोकसंख्या (World Most Population) असलेल्या देशांच्या यादीत भारताने (India) चीनला  (China) मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने (UNFPA) जागतिक लोकसंख्या अहवाल (World Population Report) जाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या 1428.6 मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या 1425.7 मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 2.9 मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं या अहवलात सांगण्यात आलं आहे. 

भारतात सर्वाधिक लोकसंख्या
UNFPA ने 2023 चा जागतिक लोकसंख्या अहवाल जारी केला आहे. ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स एंड चॉइस’ या नावाने हा अहवाल आहे. या अहवालानुसार भारताचा एकूण प्रजनन दर 2 टक्के इतका आहे. जगातील एकूण लोकसंख्येने 8 अरबचा टप्पा गाठला आहे. UNFPA च्या अहवालावर भारतातील काही प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताची 1.4 अरब लोकसंख्या ही आम्ही 1.4  संधीच्या रुपात पाहात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

2023 मध्ये भारताची लोकसंख्या 1,428,627,663 इतकी आहे, जी 2022 पेक्षा 0.81% अधिक आहे.
2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,417,173,173 इतकी होती, जी 2021 पेक्षा 0.68% अधिक आहे.
2021 मध्ये भारताची लोकसंख्या 1,407,563,842 इतकी होती, जी 2020 पेक्षा 0.8% अधिक आहे.
2020 मध्ये भारताची लोकसंख्या 1,396,387,127 इतकी होती, जी 2019 पेक्षा 0.96% अधिक आहे.

हेही वाचा :  Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

भारतात तरुणांचं प्रमाण जास्त
अहवालानुसार भारतातील लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील 25 टक्के लोकसंख्या ही 0 ते 14 वयोगटातील आहे. तर 18 टक्के लोकसंख्या ही 10 ते 19 वयोगटातील आहे. 10 ते 24 वयोगटातील आकडेवारी ही 26 टक्के आहे. म्हणजे देशात तरुण वर्गाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे अगदी या उलट चीनमध्ये परिस्थिती आहे. चीनममध्ये एक मोठा वर्ग वृद्ध आहे. 

चीनची लोकसंख्या घटली
UNFPA चे भारतातले प्रतिनिधी एंड्रिया वोजनर यांनी केलेल्या दाव्यानुसार भारतातील तरुण वर्गातील लोकसंख्या ही भारतासाठी सकारात्मक आहे. कारण भारताच्या अर्थव्यवस्था वाढीत तरुणाचा वर्गाचा मोठा हातभार आहे. ज्यामुळे आर्थिक विकासाचे नवे पर्याय वाढू शकता. या उलट चीनमध्ये तरुणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे आणि याचा त्यांचा आर्थिकवाढीवरही परिणाम दिसू लागला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …