जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?

Little Girl Viral Video : मुली या’पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ असतात. मुली आणि वडिलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. मुलांचा कायम मला एक मुलगी हवी असा सूर असतो. त्या चिमुकलीला हात घेतल्यापासून त्यांचा एक ऋणानुबंध निर्माण होतं. वडील सतत तिच्यावर प्रेमरुपी सावली घेऊन वावर असतो. मोठेपणे वडिलांसारखाच जोडीदार हवा अशी मुलींची इच्छा असते. या अशा सुंदर नात्यामुळे की काय आजही मदर्स डे पेक्षा फादर्स डे जास्त उत्साहात साजरा होतो. 

बाप-लेकीचं नातं कसं असतं…

काळ बदला, नात्याचं स्वरुप बदलं पण बापलेकीचं नातं आजही तसंच आहे. बाप-लेकीचं नातं कसं असतं हे दाखविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.  (viral video father daughter Emotional Bonding Instagram trending video social viral trends)

जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात…

इन्स्टाग्रामवरील patiljee_official हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ कोटीच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकली साधारणात दीड दोन वर्षांची असेल. तिचे बाबा 15 दिवसांनी घरी आले आहे. बाबा आले हे पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती चक्क बाबांना पाहून लाजली आणि तोंडावर हात ठेवून खाली वाकली. नंतर तुरुतुरु किचनच्या दिशेने निघाली. 

हेही वाचा :  पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ

पण बाबा आली ना तिचे मागे वळून आपली ते तिच्याकडे येतं आहेत ना…मग इवली इवली पायाने ती जात होती अचानक खाली बसली आणि रांग किचनमध्ये जाऊन बसली. बाबांना पाहून तिने चेहरा झाकला. पण बाबांची राजकन्या ना ती…चेहऱ्यावरील इवल्याशा बोटातून एका डोळ्यांनी ती वडिलांकडे पाहत होती. 

स्वर्गसुख!

आपल्या राजकन्येला वडिलांनी कुशीत उंचलून घेतलं. तिने वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांचा गालावर पापी दिली. सुख म्हणजे काय असतं…बाप लेकीसाठी यापेक्षा मोठं स्वर्गसुख काहीच नसतं. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सला आपली लेक आवडते आहे. प्रत्येक जण आले अनुभव सांगत आहे. एका यूजर्सने तर हुंडाचा मुद्दा मांडला आहे. तो यूजर्स म्हणतो की, ”विचार करा एक बाप आपल्या मुलीला आयुष्य भर किती प्रेमानी सांभाळतो ती स्वयंपाक करताना जर तिचा थोडा हाताला चटका बसला तर तो बाप तिला आयुष भर किचन रूम मध्ये जाऊ देत नाही आणि त्याच मुलीच लग्न झाल्यावर हुंडा पायी त्या मुलीला जाळून टाकतात तर विचार करा त्या बापाची परिस्थिती काय असेल?”

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …