WhatsApp ban : व्हॉट्सअॅपने 26.85 लाख खाती केली बॅन, तुमचेही Whatsapp बंद होऊ शकते!

WhatsApp ban :  गेल्या काही दिवसांपासून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपले निर्बंध कडक केले आहेत. त्यातच आता इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने सप्टेंबर महिन्यात भारतात लाखो खात्यांवर बंदी घातली आहे. सप्टेंबरमध्ये प्लॅटफॉर्मवर 26.85 लाख खाती बॅन करण्यात आली होती. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, प्रतिबंधित खात्यांपैकी सुमारे 8.72 खाती वापरकर्त्यांनी तक्रार करण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. (whatsapp ban update )

सप्टेंबरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या खात्यांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत 15% जास्त आहे. ऑगस्टमध्ये व्हॉट्सअॅपने 23.28 लाख खाती बंद केली. व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर संशयास्पद खात्यांवर दर महिन्याला बंदी घातली आहे.

व्हॉट्सअॅपने बंदी घातलेल्या खात्यांचा तपशील दिला –

कंपनीने जारी केलेल्या ‘यूजर सेफ्टी रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, ‘1 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान WhatsApp वर 26.85 लाख खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी 8.72 लाख खाती वापरकर्त्याने तक्रार करण्याआधीच बॅन केली आहेत. भारतीय खाती +91 फोन नंबरद्वारे ओळखली जातात.

वाचा : T20 World Cup 2022 मधून पाकिस्तान? जाणून घ्या यामागचं कारण 

हेही वाचा :  Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...

सप्टेंबर महिन्यात, 496 वापरकर्त्यांनी खाते बंद केल्याचा अहवाल दिला. एकूण अहवालांची संख्या 666 आहे. मागील वर्षी जारी झालेल्या आयटी नियमांनंतर WhatsApp दर महिन्याला मोठ्या संख्येने संशयास्पद खाती काढून टाकते.

अशा प्रकारे अनबॅन 

ज्या खात्यांबद्दल वापरकर्ते तक्रार करतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा काही यूजर्सचे अकाउंट चुकून बॅन होतात. असे वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप खात्यावरून बंदी हटवण्याची विनंती करू शकतात.

व्हॉट्सअॅपने त्यांच्या FAQ पेजवर ही माहिती दिली आहे. जर एखाद्या वापरकर्त्याच्या खात्यावर बंदी घातली गेली असेल तर तो त्याचे खाते उघडू शकणार नाही. स्पॅम किंवा घोटाळ्यांमध्ये गुंतल्यामुळे WhatsApp तुमचे खाते बंद करू शकते.

यासाठी तुम्हाला https://www.whatsapp.com/contact/ पेजला भेट देऊन प्रतिबंध रद्द करण्याची विनंती करावी लागेल. विनंती केल्यानंतर, तुमच्या फोनवर एसएमएसद्वारे 6 अंकी नोंदणी कोड पाठवला जाईल, जो तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची रिक्वेस्ट रिव्ह्यूसाठी पाठवू शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …