‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला

Axar Patel  BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले.

अक्षरला मिळाला पुरस्कार

अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये अक्षरने केलेल्या दमदार कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 3 सामन्यांमध्ये अक्षरने 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 10.59 च्या सरासरीने या विकेट्स घेतलेल्या. याच पार्श्वभूमीवर त्याला आगामी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

अक्षरला काय विचारण्यात आलं? आणि तो या म्हणाला?

अक्षर पटेलला आगामी कसोटी मालिकेसाठी तुझे प्लॅन्स काय आहेत असा प्रश्न समालोचक हर्षा भोगलेंकडून विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना अक्षर पटेलने माझा प्लॅन टॉप सिक्रेट आहे असं म्हटलं. आपला प्लॅन न सांगण्यामागील कारण देताना अक्षर पटेल इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्युलम समोर बसल्याचं नमूद करायला विसरला नाही.

हेही वाचा :  पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या पगाराची नोकरी, 10 पास उमेदवार करु शकतो अर्ज

“हे टॉप सिक्रेट आहे. पुढील काही दिवसांमध्ये मालिका सुरु होत असल्याने मी याबद्दल खुलासा करणार नाही. तुम्हीच तर म्हणालात की मॅक्युलम समोर बसला आहे,” असं उत्तर अक्षर पटेलने दिलं. त्याचं उत्तर ऐकून ब्रॅण्डन मॅक्युलमबरोबरच सर्वच उपस्थित जोरजोरात हसू लागले.

फिरकीचा दरारा

फिरकी खेळपट्टीबरोबर जुळवून घेण्यास इंग्लंडच्या फलंदाजांना अपयश आल्याने मागील कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. 3-1 ने इंग्लंडने मालिका गमावली होती. खेळ भावनेला धरुन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या नसल्याची टीका त्यावेळी झाली होती. मात्र भारतीय खेळाडूंनी घरच्या मैदानांवरील खेळपट्ट्या घरच्या संघाला साजेश्या बनवण्याचा हक्क असल्याचा युक्तीवाद केला होता. 

पहिल्या दिवसापासूनच फिरकी

भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांचा वापर केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इंग्लंडनेही खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल असं गृहित धरुनच सराव सुरु केला आहे. इंग्लंडच्या संघाने 3 फिरकीपटूंचा संघात समावेश केला आहे. हैदराबादमध्ये 25 तारखेपासून 29 तराखेपर्यंत मालिकेतील पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. 

हेही वाचा :  Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …