पश्चिम रेल्वेवर ‘मेगा’हाल; आता ‘या’ अ‍ॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!

Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आल्यामुळं शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवर लोकलच्या तब्बल 3126 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने आठवडाभराचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे 300 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळं रेल्वे फलाटांवर प्रवाशांची तुफान गर्दी होत आहेत. प्रवासी संख्या वाढत असताना रेल्वे रद्द झाल्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच नेमक्या कोणत्या  रेल्वे रद्द होणार आहेत, हे मात्र प्रवाशांना कळू शकणार आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी तशी सोय केली आहे. 

पश्चिम रेल्वेवर 5 नोव्हेंबरपर्यंत कोणत्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती तुम्हाला यात्री अ‍ॅपच्या माध्यमातून कळू शकणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्री अ‍ॅपवर रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची माहिती दोन दिवसांआधीच देण्यात येईल. त्याचबरोबर, तुम्ही ज्या लोकलने नियमित प्रवास करता ती फेव्हरेटमध्ये अ‍ॅड करुन ठेवा. त्या लोकलचे नियमित नोटिफिकेशनही देण्यात येतील. म्हणजेच ट्रेन रद्द झाल्याचेही नोटिफिकेशन युजर्सना मिळेल. 

हेही वाचा :  ‘ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय?,’ भाजपाचा नवाब मलिक प्रकरणावरून सवाल

नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस व लोकेशनही मिळणार आहे. यात्री अ‍ॅपवर मिळणाऱ्या नोटिफिकेशनद्वारे प्रवाशी त्यांच्या पूर्ण दिवसांचे टाइमटेबल आखू शकतात, असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

– काय आहे यात्री अ‍ॅप

12 जुलै 2022 मध्ये मध्य रेल्वेने यात्री अॅप प्रवाशांसाठी लाँच केले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना या अॅपच्या माध्यमातून लोकल ट्रेनचे रिअल टाइम लाईव्ह लोकेशन कळणार आहे. एका क्लिकवर प्रवाशांना ट्रेनचे लाइव्ह अपडेट्स, घोषणा, ताजे घोषणापत्रक, प्रमुख रेल्वेस्थानकांचे नकाशे देखील मिळणार आहे. 

– ट्रेनचे लोकेशन कसं तपासणार?

१.  तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते स्टेशन सिलेक्ट करा
२. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या प्रवासाची दिशा निवडा
३ ट्रेनचे लाइव्ह लोकेशन मिळवण्यासाठी ट्रेनच्या टाइमटेबलवर क्लिक करा

– अ‍ॅपचा अलर्ट कसा सेट कराल?

– तुम्ही आता ज्या स्थानकांवर आहात तिथून ट्रेन निवडू शकता 
– 5 ते 3 मिनिटे किंवा किंवा तुम्ही निवडलेल्या दिवसाआधी अलर्ट सेट करता येतो
– दर १५ सेकंदानंतर अॅप ऑटो रिफ्रेश होईल. युजर्स लेटेस्ट डेटासाठी रिफ्रेशवर क्लिक करु शकतात. 

हेही वाचा :  भन्नाट! आता IRCTC वर पैसे न देता तिकीट बुक करू शकतील Paytm युजर्स, पाहा पूर्ण प्रोसेस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …