मुंबईत October Heat चा कहर! मागील 10 वर्षांमध्ये केवळ तिसऱ्यांदाच असं घडलं की…; या आठवड्यातही मुंबईकरांना इशारा

Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारी मुंबईत कमाल तापमानाने उसळी घेतली होती. शनिवारी मुंबईच्या कमाल तापमान 37 अंशापार पोहोचले होते. उन्हाच्या काहिलीमुळं अनेक नागरिक हैराण झाले होते. तर, यंदाचा ऑक्टोबर अधिक उष्ण असल्याचे भाकित हवामान विभागाने आधीच वर्तवले होते.  

पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कोकण विभागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. तसंच, मुंबईच्या हवेतून आर्द्रता कमी झाली असून शनिवारी दिवसभर मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागते होते. दरम्यान शनिवारी नोंदवले गेलेले तापमान हे या हंगामातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. एका दशकात ऑक्टोबर महिन्यात नोंदवलेले तिसऱ्यांदा उच्च तापमानाची नोंद झाली आहे. 

2018मध्ये, ऑक्टोबर महिन्यातील 29 तारखेला कमाल तापमान 38 अंश नोंदवले होते. तर 2015 मध्ये, 17 ऑक्टोबर रोजी दिवसाचे तापमान 38.6 अंशांवर पोहोचले होते. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं आणि अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ हेदेखील तापमानात वाढ होण्यात कारणीभूत ठरले होते. 

हवामान विभागाने आपल्या पाच दिवसांच्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहिल. त्यामुळं पुढच्या आठवड्यातही किमान तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळं मुंबईकरांना डोळे चुरचुरणे, डोकेदुखी, डिहायड्रेशनसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 

हेही वाचा :  तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडचा नियम अखेर मागे; झी २४ तासचा इम्पॅक्ट!

दरम्यान, शविवारी सांताक्रुझ येथे 1.5 अंशानी तापमान सरासरीपेक्षा तब्बल 3.5 अंशांनी अधिक होते. MD कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेली आर्द्रता पातळी अनुक्रमे ५८% आणि ७२% होती. उत्तर-पश्चिम गुजरातमधील सततच्या चक्रीवादळामुळे दिवसा तापमानात वाढ होतेय तसंच, अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना विलंब होत असल्याने तापमानात वाढ झाली आहे. सामान्यत: समुद्री वारे दुपारी 1 वाजेपर्यंत वाहण्याची अपेक्षा असते, परंतु शनिवारी उशीर झाला, परिणामी तापमानात वाढ झाली, असं हवामान विभागाने म्हटले आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विल्यम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधनं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या …

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …