साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग ‘या’ राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे.  हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 29 January to 03 February 2024 budhaditya rajyog and gajkesari yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign)

मेष (Aries Zodiac) 

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. नवीन प्रकल्पामध्ये व्यस्त असणार आहेत. कुटुंबाच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. तुमचं मन प्रसन्न असणार आहे. आर्थिक बाबतीत काही कारणाने तुमचा खर्च वाढणार आहे. या आठवड्यात आरोग्य नाजूक असणार असून त्याकडे दुर्लक्ष करु नका. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास फायद्याचं होईल. आठवड्याच्या शेवटी चर्चेद्वारे प्रकरणे सोडवल्यास चांगले परिणाम मिळतील. 

शुभ दिवस: 29, 30, 31

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. व्यवसायात प्रगतीच्या शुभ संधी तुम्हाला लाभणार आहेत. मुलांच्या सहवासात तुम्ही जितका जास्त वेळ घालवाल तेवढा आनंद तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास योग्य होईल. कुटुंबातील एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. 

हेही वाचा :  प्रेम आंधळ असतं! नवऱ्याला धोका देत मुलाशी शारीरिक संबंध, लग्न करत ती झाली दोन मुलांची आई

शुभ दिवस: 29, 30

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत.  त्यांचा सन्मान या आठवड्यात वाढणार आहे. या आठवड्यातील प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. कुटुंबात नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश प्राप्त होईल. आठवड्याच्या शेवटी घरापासून दूर राहिल्याने मनात अस्वस्थता वाढणार आहे. 

शुभ दिवस: 29, 30,31,1

कर्क (Cancer Zodiac)   

या आठवड्यात या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत शुभ संयोग असणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचं शुभ परिणाम तुम्हाला यश मिळवून देणार आहे. तुम्हाला कुटुंबात काही बंधने जाणवतील आणि तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन सुरुवात करण्याबाबत अधिक चिंता असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी स्त्रीमुळे अडचणी वाढणार आहेत. या आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल असेल. 

शुभ दिवस: 29,1,2

सिंह (Leo Zodiac) 

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. अन्य प्रकल्पाकडेही वाटचाल तुम्हाला फलदायी ठरणार आहे. आर्थिक सुधारणार असून तुम्हाला धनलाभ होणार आहे. खास करुन गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळणार आहे. प्रियजनांच्या सहवासात वेळ घालवल्याने तुम्हाला तुमचं आरोग्य चांगल परिणाम करणार ठरणार आहे. कुटुंबात नवीन सुरुवात केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभ संयोग असणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचेही शुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी परस्पर चर्चेने प्रकरणे सोडवल्यास फायदा होईल. 

शुभ दिवस: 29,30,1,2

कन्या (Virgo Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही ठोस निर्णय घेणार आहात. कुटुंबातील परस्पर प्रेम दृढ होणार आहे. तुम्ही चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेणार आहात. बेफिकीर राहिल्यासच आर्थिक बाबी अडचणी येतील. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश प्राप्त होईल. तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून तुमचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. 

हेही वाचा :  Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!

शुभ दिवस: 29,31

तूळ (Libra Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ प्रवासाच्या संधी आणि यश घेऊन आला आहे. तुम्ही ध्यान आणि योगामध्ये जितका जास्त वेळ घालवाल तितकं तुमचं कल्याण होणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात सुख-शांती लाभणार आहे. प्रेम जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी समस्या वाढणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. अन्यथा तुमचं खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी आयुष्यात खूप सुधारणा होणार आहे. 

शुभ दिवस : 30,1,2

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. नवीन प्रकल्प तुमच्या बाजूने निर्णय घेणार आहेत. आर्थिक बाबतीतही चढ-उतार पाहिला मिळणार असली तरी यश तुम्ही प्राप्त करु शकणार आहात. प्रवासातूनही या आठवड्यात शुभ परिणाम मिळणार आहे. मात्र मुलांशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होणार आहे. या आठवड्यात तणावामुळे किंवा गॅस इत्यादी समस्यांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये अस्वस्थता वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचा सुंदर मिलाफ पाहिला मिळणार आहे. 

शुभ दिवस: 29,2

धनु (Sagittarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती लाभणार असून मन प्रसन्न असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे सततचे प्रयत्न शेवटी तुम्हाला आनंदाचे क्षण देणार आहेत. आर्थिक बाबतीत लक्ष देण्याची गरज असून प्रयत्नाने संपत्ती भर पडणार आहे. या आठवड्यात कुटुंबासोबतचे अंतर वाढण्याची शक्यात आहे. काही नुकसान होऊ शकतं. 

हेही वाचा :  Horoscope 22 January 2024 : तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

शुभ दिवस: 29,1

मकर (Capricorn Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. उत्सवाच्या शुभ संधीही निर्माण होणार आहे. आर्थिक बाबतीतही आर्थिक लाभासाठी शुभ स्थिती असणार आहे. ज्याने कठोर परिश्रम करून जीवनात यश मिळवले आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुम्हाला कुटुंबात आनंद आणि शांती जाणवणार आहे. या आठवड्यात तुम्हाला भेटवस्तू देखील मिळणार आहे. प्रवासासाठी हा आठवडा चांगला असून प्रवासात मन प्रसन्न असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेणार आहात. 

शुभ दिवस: 29, 30,1,2

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात गोड आणि आंबट अनुभव येणार आहेत. आर्थिक बाबतीत नेटवर्किंगद्वारे आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यापासून तुमचं आरोग्य सुधारणार आहे. मुलांच्या सहवासात वेळ घालवल्याने तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे. कौटुंबिक बाबतीत शांतता असणार आहे. कामाच्या ठिकाणी संवादाने समस्या सोडवल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी, वडीलधाऱ्यांच्या मदतीने जीवनात आनंददायक क्षण मिळणार आहे. 

शुभ दिवस: 29, 30,1,2

मीन (Pisces Zodiac) 

आर्थिक बाबतीत मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली असणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी पैशाचा ओघ वाढविणारी ठरणार आहे. कोणत्याही नवीन आरोग्य कार्याबाबत सुरुवातीला तुम्हाला थोडी काळजी वाटेल मात्र नंतर सर्व सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीची होणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णय घेणार आहात. प्रवासातून यश प्राप्त करणार आहात. 

शुभ दिवस: 1,2

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …