‘पार्थ पवारांच्या डोक्यावर थंड बर्फ ठेवावा’, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नावर अजितदादांची गुगली; पाहा Video

Ajit Pawar On Parth Pawar :  गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळाल्या आहेत. अनपेक्षित राजकीय गट निर्माण झाले तर त्याआधी युती आणि आघाड्यांनी राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. आता लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात हालचाली दिसत आहेत. अशातच अजित पवार यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी राजकीय प्रश्नांची तसेच खासगी प्रश्नांची देखील हलकीफुलकी उत्तरं दिली.

काय म्हणाले अजित पवार?

मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे, नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते, असंही अजित पवार म्हणाले. जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असा प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतंल. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली. कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी ‘थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल’, असा सवाल विचारला. त्यावेळी अजितदादांनी थेट सुपूत्र पार्थ पवार यांचं नाव घेतलं. त्यामुळे कार्यक्रमात हशा देखील पिकला होता.

हेही वाचा :  शिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे

रिमोट कंट्रोल कोण वापरतंय? आणि कोणाच्या हातात जायला हवा? या प्रश्नावर अजित पवारांनी गुगली टाकली. हा माझ्याच हातात असावी, असं अजित पवार म्हणाले. तर भोंगा पाठवायचा असेल तर सकाळी 9 वाजता पाठवायला पाहिजे, असं अजितदादा म्हणाले. तर तिळगूळ पाठवायचं असेल तर ते ठाण्याला पाठवा, असं म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला.

पाहा Video

https://www.youtube.com/watch?v=EM25Rut095U

जर घरगुती वाद झाला तर सॉरी आधी कोण म्हणतं? असा सवाल जेव्हा अजित पवारांना विचारला गेला, तेव्हा, त्यांनाच मागावी लागेल जर माझ्याशी बोलायंच असेल तर, असं उत्तर अजितदादांनी दिलं. अवधुत गुप्ते यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांचा रडतानाचा व्हिडीओ दाखवला, त्यावेळी मी राजकीय भूमिका घेतली आहे. आमच्या कुटूंबात व्यक्तीस्वातंत्र्य आहे. आम्हाला आत्ताच्या घडीला जी विचारधारा मान्य आहे, त्यावर आम्ही अंमलबजावणी केली. आम्ही काही वेगळं काही केलं नाही, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …