Maharastra Politics : ‘गोप्याला आवर घाला नाहीतर…’, अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Maharastra Political News : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देखील लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिलं नाही. यावर उत्तर देताना पडळकरांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही, असा आरोप करत लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असा उल्लेख गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यावरून आता वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले मिटकरी?

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या आणि घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर (Amol Mitkari On Gopichand Padalkar) यांना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते पडळकर?

धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो. तुमच्या वडिलांनी, भावानं, पुतण्यानं किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत, असं म्हणत पडळकरांनी हल्लाबोल केला होता. त्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) रान पेटलं आहे.

हेही वाचा :  बोलेरोने धडक दिल्यानंतर चार वर्षाच्या मुलासह फरफटत गेली बाईक, नंतर जे काही झालं ते पाहून सगळे सुन्न झाले

आणखी वाचा – Shiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात मिटकरी विरुद्ध पडळकर हा वाद हमखास पहायला मिळतो. आता पडळकरांच्या वक्तव्यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या वादावर आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेणार हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …