नेटफ्लिक्सवरील या कोरियन सीरिज पाहिल्यात?

Netflix Thriller K-Dramas: ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज लोक आवडीनं बघतात. सध्या तरुणांमध्ये कोरियन ड्रामाची क्रेझ वाढलेली दिसत आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) तुम्ही कोरियन वेब सीरिज पाहू शकता. नेटफ्लिक्सवरील या सात कोरियन सीरिजबद्दल जाणून घ्या-

स्क्विड गेम (Squid Game)
‘स्क्विड गेम’या कोरियन वेब सीरिजचा पाहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. स्क्विड गेम वेब सीरिजमध्ये जुंग जाए आणि पार्क हे सू या दोघांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ह्वांग डोंग-ह्युक यांने द स्क्विड गेम या सीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक आहे. ‘स्क्विड गेम’ ही वेब सीरिज एका खेळाशी निगडीत आहे. या खेळामध्ये 456 खेळाडू खेळ खेळत असतात. खेळात खुप अडचणींना सामोरे जावे लागते.

द सायलेंट सी (The Silent Sea)
‘द सायलेंट सी’ ही कोरियन वेब सीरिज 2021 मध्ये रिलीज झाली होती. या वेब सीरिजचे लेखक पार्क युन-क्यो आहेत. ‘द सायलेंट सी’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन चोई हँग यांनी केले. ‘द सी ऑफ ट्र्रॅनक्किलिटी’ या लघुपटावर आधारित असणारी ‘द सायलेंट सी’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या सीरिजचे एकूण आठ एपिसोड्स आहेत. या सीरिजची कथा थ्रिलर आणि रहस्यमय आहे. 

हेही वाचा :  Rupa Dutta : अभिनेत्रीनं चक्क पाकिट मारलं, पोलिसांनी केली अटक

हेलबाउंड (Hellbound)
हेलबाउंड या वेब सीरिजचे दिग्दर्शन येओन सांग-हो यांनी केले. हेलबाउंड या वेब सीरिजमध्ये यू आह-इन,किम ह्यून-जू,पार्क जेओंग-मिन,वॉन जिन-आह आणि यांग इक-जून यांनी भूमिका साकारल्या आहेत.  19 नोव्हेंबर 2021 रोजी ( Netflix)वर रिलीज करण्यात आली होती. 

माय नेम (My Name)
‘माय नेम’ या वेब सीरिजचे दिग्दर्शक किम जिन-मिन आहेत. हान सो-ही,पार्क ही-सून आणि आहन बो-ह्यून यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजचे कथानक एका महिलेवर आधारित आहे. ही वेब सीरिज 15 ऑक्टोबर 2021 रोजी ( Netflix) वर रिलीज झाली.

जुवेनाइल जस्टिस (Juvenile Justice)
जुवेनाइल जस्टिस या वेब सीरिजचे दिग्दर्शक हाँग जोंग-चॅन आहेत. किम हाय-सू,किम मु-येओल आणि ली सुंग-मिन यांनी काम केले आहे. एका न्यायाधीशाची कथा या  वेब सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवर 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाली.

टॅक्सी ड्रायव्हर (Taxi Driver)
‘टॅक्सी ड्रायव्हर’ ही वेबसीरीज एकूण 16 भागांची आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाचं आणि या सीरिजच्या कथानकांचं अनेकांनी कौतुक केलं. 

द अनकॅनी काउंटर (The Uncanny Counter)
‘द अनकॅनी काउंटर’ या वेब सीरीजमध्ये जो ब्युंग-ग्यू,यू जून-सांग,किम से-जेओंग आणि येओम हाय-रॅन यांनी भूमिका साकारली आहे. ‘द अनकॅनी काउंटर ही वेब सीरिज 16 एपिसोडची असणार आहे.

हेही वाचा :  जामीन याचिकेच्या सुनावणीसाठी जॅकलिन फर्नांडिस पोहोचली कोर्टात

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

RRR: ‘आरआरआर’ ची क्रेझ पाकिस्तानात; ‘नाटू-नाटू’ वर अभिनेत्रीनं धरला ठेका, नेटकरी म्हणाले, ‘हा डान्स आहे की…’

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …