Viral Video : ”लाज कशी वाटली नाही?”, महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?

Agra Viral Video : माणुसकीला लाजवेल अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. खरंच पैसाचं सगळं असतं का हो? आपण पाहिलं आहे पैशांसाठी भाऊ भाऊचा वैरी झाला आहे. संपत्ती आणि मालमत्तेसाठी नात्यांचा विसर पडल्याचा अनेक घटना आपण ऐकल्या वाचल्या अगदी डोळ्यांनी पाहिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ व्यक्ती कृत्य पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. 

”लाज कशी वाटली नाही?”

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने कार थांबवली आणि मृत्यूपत्रावर मृत वृद्ध महिलेच्या अंगठ्याचे ठसे उमटवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. या धक्कादायक व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. 

काय आहे व्हिडीओमागील सत्य? 

मिळालेल्या माहितीनुसार 8 मे 2021 मध्ये कमला देवी यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयता नेत असताना कमला देवी यांच्या मोठ्या दिराचा मुलगा बैजनाथ आणि अंशुल यांनी रस्त्यात बळजबरीने कार रोखली. त्यांच्यासोबत वकिलही होता. यावेळी त्यांनी मृत्यूपत्रावर त्यांनी कमला देवीच्या म्हणजे मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे घेतले आणि संपत्ती आपल्या नावावर करु घेतली, असं कमलादेवी यांचे नातू जितेंद्र शर्मांनी यांनी सांगितलं. (shocking advocate took thumb impression from woman dead body Video Viral on Social media google trending now)

हेही वाचा :  Viral Photo : व्हायरल झालेला 86 वर्ष जुना फोटो सगळेच होत आहेत हैराण परेशान; असं आहे तरी काय यात?

जितेंद्र शर्मांनी पुढे म्हणाले की, ”या घटनेसंदर्भात 21 मे 2022 मध्ये पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. पण पोलिसांनी कारवाई केली नाही.”  जितेंद्र शर्मांनी यांनी हेही सांगितलं की, ”आजीच्या मोठ्या दिराचा मुलगा बैजनाथ आणि त्यांची मुलं हे अनेक वर्षांपासून कमलादेवींवर दबाव टाकत होती.”

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

दरम्यान हा व्हिडीओ ट्वीटरवर @RoliTiwariMish1 या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना आगरामधील असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसीपी अर्चना सिंह यांनी या घटनेची दखल घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सिंह यांनी दिले आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …