viral video: ooouch! सापाचं तोंड हातात पकडून रुग्णालयात पोहोचला तरूण… गावकऱ्यांची उडवली झोप

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपूरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण होय एक तरुण चक्क सापाच तोंड हातात पकडून रुग्णालयात उपचारासाठी पोहचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि सगळेच घाबरले. पण थांबा त्या तरुणाला साप चावल्यानं उपचार करताना सोप्पं जावं म्हणून चक्क रसल वायपर (russel viper) घेऊन तो इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज या शासकीय रुग्णालयात  पोहचला. पंकज सपाटे असे 37 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सध्या त्याचावर उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जातं आहे. सापाच तोंड हातात पकडून रुग्णवाहिकेतून 10 ते 15 मिनिटाचा प्रवास केला. (The young man reached the hospital holding the snake’s mouth in his hand)

पंकज सपाटे हा 37 वर्षीय तरुण आहे. त्याला कोराडी परिसरात औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील मैदानाजवळ साप दिसला. पण तो साप पकडताना त्याचा हातात काहीच साहित्य नव्हतं. दरम्यान पकडण्याचा प्रयत्नात असताना अचानक त्या रसल वायपर सापांनं पंकजच्या डाव्या हाताला चावा घेतला. लागलीच पंकजने त्या सापापासून तोंड पकडून हातापासून वेगळे केले. त्यानंतर वसाहतीतील आरोग्य केंद्रात जाऊन तिथल्या रुग्णवाहिकेत (Ambulance) बसून पंकज उपचारासाठी नागपूरच्या (Nagpur) दिशेने निघाला. पण त्या सापाच तोंड घट्ट पकडून पंकजने जवळपास 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास केला हे विशेष, सापांच तोंड पकडून तो रुग्णालयात पोहचला.

हेही वाचा :  एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले...

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण… थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

नक्की काय घडला प्रकार: 

पंकजने यापूर्वी साप पकडले आहे. पण तो प्रशिक्षित सर्पमित्र नाही. त्याला सापाची ओळख किंवा सापांचा विषारी प्रजातीबद्दल फारसं माहीत नाही. त्यामुळं पंकजनं या कठीण प्रसंगात भिऊन न जाता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सोपं ठराव म्हणून साप सोबत घेऊन रुग्णालयात नेण्याचं धाडस केलं. पंकजने सापानं दंश केल्यानंतर त्याच तोंड पकडून हातात धरून तो रुग्णवाहिकेत पोहचला. दरम्यान तो रुग्णवाहिकेत हातातील साप (snake video) सुटला असता तर आणखी धोकादायक झालं असतं. पण नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात पोहचला. डॉक्टर आणि परिचारिका याना साप दिसताच अजूनच घाबरून गेलेत. रुग्णालयात काही वेळ एकच खळबळ उडाली. 

हेही वाचा : बाबोsss…हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही….

उपचार महत्त्वाचे : 

उपस्थितीत डॉक्टरानी त्या सापाला प्रसंगावधान राखत प्लास्टिक पिशवीत ठेवून ती पिशवी बांधण्यास सांगितलं आणि पंकजवर उपचार सुरु केलेत. तसेच सर्पमित्राला पाचारण केलेत. तेच पंकजवर विविध तपासणी नंतर मेयोत त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर होत असल्याचं सांगितलं जातं आहे. या सापाला जंगलात परत सोडलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अधिकृत सर्पमित्र असलेल्या नितीन भांदक्कर (snake viral news today) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या सापाला स्टिकच्या साह्याने एका प्लस्टिक पेटीत बंद करून रसल वायपरला जंगल अधिवासात सोडले. 

हेही वाचा :  Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

माहिती नसणं जीवावर बेतू शकतं : 

यात ज्यांना सापांबद्दल फारशी माहिती नाही त्यानी सापाला हाताळण्याची चूक करू नये. कारण बरेचदा विषारी साप असतात. त्याची ओळख नसल्यानं त्या सापानी चावा घेतल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे उगाच धाडस करणं खेळ करणं चुकीचं असल्याचं भांदक्कर सांगतो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …