Viral Video : …आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद

Metro Viral Video : सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. हृदय कमजोर असल्याने हा व्हिडीओ चुकूनही बघू नये. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अचानक महिलेला घट्ट धरुन धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली झाली आहे. 17 सेकंदाच्या क्लिपमध्ये अंगावर शहारा आणणारा तो क्षण त्या महिलेनेही कधीही विचार केला नसेल. 

…आणि त्याने महिलेला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हे एक मेट्रोचं स्टेशन आहे. प्लॅटफॉर्मवर दोन महिला दोन पुरुष चालताना दिसत आहे. तर एक व्यक्ती बसलेला आहे. समोरुन मेट्रोचा लाइट दिसत आहे. नीट बघा पिवळा ड्रेस घातलेल्या महिलेच्या मागे एक व्यक्ती चालत येत आहे. त्या महिलेच्या धानीमनी पण नसणार पुढच्या क्षणी तिच्यासोबत काय घडणार आहे ते…अशी वेळ कोणावरही येऊन नये. मेट्रो तिच्या गतीने प्लॅटफॉर्मच्या दिशेने येत आहे. 

महिला हळूहळू पुढे जात आहे आणि मागून तो व्यक्ती चालत आहे. जशी मेट्रो प्लॅटफॉर्मवर येणार तेवढ्यात तो व्यक्ती त्या पिवळ्या ड्रेसच्या महिलेला मागून घट्ट धरुन उचलतो आणि धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो. ते दोघे रुळावर पडतात अन् त्यांच्या अंगावरुन मेट्रो जाते असं चित्र सीसीटीव्हीत दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्मवरील दुसरी तरुणी हे दृष्य पाहून घाबरते आणि उलट्या दिशेने धावत सुटते. (boyfriend jumped in front of the running metro holding the girlfriend in his arms cctv video Viral on internet trending news today)

हेही वाचा :  लहान मुलांसाठी घेतला मोठा निर्णय... पालकांच्या जबाबदारीत वाढ

कोण होते ते आणि कुठली आहे ही घटना?

मिळालेल्या माहितीनुसार काही लोकांनी दावा केला आहे की, ते दोघे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येतो आहे. ही घटना कोलकात्याच्या नोआपर मेट्रो स्टेशनची असल्याचं बोलं जातं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळे तर्क लावत आहे. काही यूजर्सचं म्हणं आहे की, ती महिला पळून जात होती म्हणून त्या व्यक्तीने तिची हत्या केली. हा व्हिडीओ ट्वीटरवर Shailendra Tiwari या यूजरने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्यांनी उडी घेतली पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने मेट्रोला ब्रेक लावला. तिथे उपस्थित असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …