Viral Video: 35000 फूट उंचीवर बिघडला IndiGo फ्लाईटचा AC; प्रवाशांना फुटल्या घामाच्या धारा, कॅप्टनने असं काही केलं की…

No AC on IndiGo flight: तुमच्यासोबत कधी काय होईल सांगता येत नाही. हल्ली हवाई प्रवास (IndiGo flight Viral Video) करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना देखील चांगला फायदा होताना दिसतो. मात्र, त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता इंडिगोच्या फ्लाइटमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे. 

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर कंडिशनिंग बंद झालं. सुमारे तासाभरात प्रचंड उकाड्यामुळे विमानातील प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. यानंतर इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आहे. मात्र, प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी विमानाच्या आतील काही व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये प्रवासी विमानाच्या सिक्युरिटी कार्डचा हात पंख्याप्रमाणे वापरताना दिसत आहेत. त्याच वेळी, घामाने चिंब चिंब झालेल्या प्रवाशांना घाम पुसण्यासाठी टिश्यूचे वाटप करण्यात आला.

आणखी वाचा – युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये घुसली वाघीण, कोण बेडखाली लपलं तर कोण कपाटावर; पाहा Video

हेही वाचा :  सर्वसामान्यांना झटका! महाराष्ट्रात पेट्रोल महाग तर डिझेल 93.35 रुपयांवर, वाचा तुमच्या शहरातील दर

तुमच्या अलीकडील प्रवासादरम्यान आमच्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांची सोय आणि समाधान गांभीर्याने घेतो आणि इंडिगो फ्लाइट (IndiGo flight 6E7261) चंदीगड ते जयपूरला झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, असं एअरलाइनने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. जयपूरमध्ये उतरल्यानंतर विमानाच्या वातानुकूलन यंत्रणेची तपासणी करण्यात आली. तपासणी आणि दुरुस्तीनंतर विमानाला पुढील उड्डाणांसाठी सोडण्यात आल्याची माहिती देखील या निवेदनात देण्यात आली आहे.

पाहा Video

दरम्यान, एकाच दिवशी इंडिगोच्या फ्लाईटसंबंधी तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. इंजिन खराब झाल्याने जय प्रकाश नारायण विमानतळावर एका फ्लाईटचं एमरजन्सी लँडिंग करण्यात आलं. तर रांचीला जात असलेलं एक विमान तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. तर तिसरी घटना ही एसी खराब झाल्याची घडली आहे. त्यामुळे आता सोशल मी़डियावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.

हेही वाचा :  ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची होतेय पूजा?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …