नवरा आणि दिराने मित्रांना घरी आणले, विवाहितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, नकार देताच…

Gangraped On Women: देशात महिला अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशीमधील (Uttar Pradesh) बरेली येथे विवाहितेसोबत तिच्याच घरच्यांनी गैरव्यवहार केला आहे. पती आणि दिराने विवाहितेसोबत भयंकर कट रचल्याचा आरोप तिने केला आहे. तर, तिच्या सासऱ्यांनीही तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Husband Raped On Wife)

विवाहितेवर आठ जणांनी केला सामूहिक अत्याचार

बरेलीत राहणाऱ्या एका विवाहितेने आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार, तिच्या पती आणि दिराने मित्रांना घरी बोलवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतकंच नव्हे तर त्यानंतर तिच्या सासऱ्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सर्व त्रास असह्य झाल्याने मीरगंज पोलिस ठाण्यात तिने पती दिरासह आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. 

प्रेयसीसोबत रचला जीवेमारण्याचा कट

5 मार्च 2023मध्ये महिलेचे लग्न भोजीपुरा गावातील रहिवासी शाहरुखसोबत झालं होतं. तिचा पती नोएडा येथे एका कंपनीत कामाला होता. त्याच कंपनीत त्याची प्रेयसीदेखील आहे. दोघांनी मिळून कित्येकदा महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं तीने तक्रारीत नमूद केलं आहे. 

हेही वाचा :  बायकोने केलेली 'ती' मागणी ऐकून नवऱ्याचं डोकंच सणकलं; पत्नीसह 3 मुलींना निर्घृणपणे संपवले

दिरानेही केला अत्याचार

8 जून रोजी महिलेचा पती शाहरुख त्याचा मित्र आरिफसोबत घरी आला. त्यानंतर दोघांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. तिने नकार दिल्यास दोघांनीही तिला जबर मारहाण केली. नवऱ्याने विश्वासघात केल्यानंतर संपूर्णपणे तुटून गेली होती. इतकंच नव्हे तर, दुसऱ्यादिवशी दिरानेही त्याच्या एका मित्रासह तिच्यावर बलात्कार केला. महिलेने घडलेला सगळा प्रकार तिच्या सासूला सांगितला. मात्र तिनेही तिला धमकावत गप्प बसण्याचा इशारा दिला.

सासऱ्यांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला

महिलेने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात जायची धमकी दिली तेव्हा तिच्या सासऱ्यानी तिच्यावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने तिथून सुखरुप सटकण्यात तिला यश आले. महिलेने तडत तिचे माहेर गाठले व पोलिसांत तक्रार दाखल केली.

तीन तलाक देत घराबाहेर काढले 

विवाहितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, एकदा रागाच्या भरात पतीने तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर तीन तलाक देत तिला धक्के मारुन घराबाहेर काढले. पीडितेच्या तक्रारीनंतर एसएसपींच्या आदेशानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेले नाही.

हेही वाचा :  सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह यांनी सोडलं मौन, म्हणाले "मग..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …