Viral Polkhol : गांधीजींच्या फोटोजवळ हिरवी पट्टीवाली नोट नकली? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral Polkhol : तुम्ही वापरत असलेली 500 रुपयांची नोट (Rs. 500 Note) नकली (Fake Currency) असल्याचा दावा करण्यात आला आहे.  कारण पाचशेच्या काही नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोजवळ हिरव्या रंगाची पट्टी (Green Stripe) आहे. तर काही नोटांवर ही हिरवी पट्टी गांधीजींच्या फोटोपासून काहीशी दूर आहे. हा दावा केल्यानं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. मग नोट नक्की खरी तरी कोणती…? हाच प्रश्न उपस्थित झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज (Viral Message)
500 रुपयांच्या नोटेवर हिरवी पट्टी आरबीआय गर्व्हनर यांच्या सहीजवळ नसून ती महात्मा गांधी यांच्या फोटोजवळ असेल, तर अशी नोट स्वीकारू नये. ती नोट नकली आहे. असा दावा एका सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये करण्यात आलाय.

सध्या 2000 रुपयांची नोट फार कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. बँका तसंच एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. याचा अर्थ सध्या देशातल्या चलनातली सर्वांत मोठ्या रकमेची नोट 500 रुपयांची आहे. मात्र, ती नकली असेल तर ओखळायची कशी…? खरंच या दाव्यात किती तथ्य आहे…? 

हेही वाचा :  Fack Chek : चहा प्याल तर बुटके व्हाल? तुमचीही दिवसाची सुरुवात चहाने होते... मग ही बातमी वाचाच

व्हायरल पोलखोल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा (Fake Viral Message)


नोट कुणी छापू नये यासाठी 17 वेगळे फीचर्स दिलेयत


500 रुपयांच्या काही नोटांवर हिरवी पट्टी फोटोजवळ आहे 


काही नोटांवर गांधींजींच्या फोटोपासून हिरवी पट्टी दूर आहे, दोन्ही नोटा चलनात आहेत, घाबरण्याचं कारण नाही


यापूर्वीही  5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असं सांगण्यात येत होतं. याविषयीची माहिती सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, तुम्हाला घाबरवण्यासाठी चुकीचे मेसेज व्हायरल केले जातात. पाचशेच्या दोन्ही नोटा चलनात असून आमच्या पडताळणीत दावा असत्य ठरला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …