विदुलाच्या निरागस सौंदर्यात ‘जीव झाला येडापिसा’

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतून अनेक चाहत्यांच्या मनात अभिनेत्री विदुला चौगुलेने घर केले. निरागस, सालस अशी ही अभिनेत्री मालिकेतून अनेकांना आवडली .खऱ्या आयुष्यात मात्र विदुला खूपच बिनधास्त आहे. फॅशन सेन्सच्या बाबतीत विदुला अनेकांना मागे पाडू शकते. केवळ भारतीयच नाही तर मॉडर्न लुकमध्ये विदुलाने अनेक हिरॉईन्सना मागे टाकल्याचे दिसून येत आहे.

विदुला नेहमीच चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते. तिचे वेगवेगळे फॅशन लुक्स खास तुमच्यासाठी. विदुलाच्या या फॅशन लुक्सवरून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता. विदुलाच्या अदा आणि लुक्स नक्की पाहा. (फोटो सौजन्य – @vidulachougule Instagram)

​कलमकारी डिझाईन ब्लाऊजसह Ravishing Look​

-ravishing-look

विदुला दिसायला अत्यंत सुंदर असून कोणतीही स्टाईल उत्तम कॅरी करते. गुलाबी कॉटन साडीसह तिने कलमकारी चॉकलेटी ब्लाऊज मॅच केला आहे. एकदम देसी लुकमध्ये विदुलाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यासह कॉपर दागिने आणि मिनिमल लुकसह तिने हा देसी लुक पूर्ण केला. कोणत्याही आर्ट फेस्टिव्हलमध्ये असा लुक करता येईल.

हेही वाचा :  Home Remedies For Back Pain : कंबरदुखीने हैराण झालात, या ६ घरगुती उपयांनी मिळवा कायमची सुटका

​बॉडीकॉन ऑफ शोल्डर ड्रेस​

​बॉडीकॉन ऑफ शोल्डर ड्रेस​

लाईट पिंक रंगाचा बॉडीकॉन शॉर्ट ड्रेसमध्ये विदुलाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. मोकळे केस आणि ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये विदुला अत्यंत सुंदर दिसत असून कोणत्याही पार्टीसाठी असा लुक तुम्ही करू शकता. यासह शिमरी बेली शूज आणि मोत्यांचे कानातले, मिनिमल मेकअप करून तिने लुक पूर्ण केला आहे. हा परफेक्ट पार्टी लुक आहे.

(वाचा – राहा कपूरची आजी होतेय अधिक तरूण, फॅशनच्या बाबतीत सून आलियाही देतेय तगडी टक्कर नीतू कपूर)

​हॉल्टर नेक क्रॉप टॉप आणि शॉर्ट जीन्स​

​हॉल्टर नेक क्रॉप टॉप आणि शॉर्ट जीन्स​

विदुलाचा भगव्या रंगाचा हॉल्टर नेक क्रॉप आणि शॉर्ट जीन्समधील मॉडर्न लुक बीचसाठी परफेक्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाताना तुमच्या मित्रमैत्रिणींसह असाल तर असा लुक तुम्हाला अधिक फॅशनेबल आणि स्टायलिश दिसू शकतो.

(वाचा – अंबांनीची सून राधिका मर्चंटची स्टायलिश एंट्री, गुलाबी रफल साडी आणि चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल)

​ऑल व्हाईट लुक​

​ऑल व्हाईट लुक​

व्हाईट शर्ट जॅकेट आणि त्याखाली व्हाईट ट्राऊझर असा कॉर्पोरेट कम स्टायलिश लुक विदुलाच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासह बांधलेले केस आणि त्यासह मॅच केलेला नेकलेस वेगळीच स्टाईल दर्शवत असून तुम्हालाही स्टाईलमध्ये वेगळेपणा दाखवायचा असेल तर असा लुक करू शकता.

हेही वाचा :  तुम्हालाही सोडवायचय फोनचे व्यसन मग 'ही' आहे योग्य पद्धत

(वाचा – मौनी रॉयचा साडीतील रॉयल अंदाज, चाहत्यांची नजरच हटेना अदांनी केले घायाळ)

​थाई स्लिट कट ब्राऊन गाऊन​

​थाई स्लिट कट ब्राऊन गाऊन​

पार्टी लुकसाठी विदुलाच्या या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. थाई स्लिट कट ब्राऊन गाऊन आणि त्यासह शिमरी आणि ग्लॉसी परफेक्ट मेकअप अधिक सुंदर दिसतोय. कोणत्याही हाय स्टँडर्ड पार्टीसाठी हा लुक अप्रतिम दिसेल.

​बॅकलेस हॉल्टरनेक गाऊन​

​बॅकलेस हॉल्टरनेक गाऊन​

समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी फिरण्यासाठी विशेषतः गोवा, बाली अशा समुद्रकिनाऱ्यावर ट्रीप आखणार असाल तर असा बॅकलेस हॉल्टरनेक गाऊन तुमच्या लुकमध्ये भर घालतो. विदुलाचा हा लुक अप्रतिम असून तिच्यावरून नजरच हटत नाहीये.

विदुलाचे हे लुक तुम्हीही ट्राय करू शकता. तिच्या स्टाईलवरून दिलेल्या टिप्सचा वापर करून तुम्हीही तुमचे फॅशन स्टाईल स्टेटमेंट अपडेट करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …