भाजप कार्यकर्त्याकडून मतदान केंद्रात मोबाईलचा वापर, फोनवर बोलतानाचा व्हिडीओ समोर

Dhule BJP Activist Use Phone : राज्यात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आणि मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण आता भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यातील धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर केल्याचे धक्कादायक दृश्य झी 24 च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

मतदान केंद्रावर सर्रास मोबाईलचा वापर

या व्हिडीओत भाजपचे पदाधिकारी हिरामण गवळी हे मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहेत. यात एकीकडे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे मतदान करत असताना दुसरीकडे हिरामण गवळी मात्र मोबाईलचा वापर करत असल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे निवडणूक आयोगाने सर्वांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यात बंदी घातली आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते हिरामण गवळी मतदान केंद्रावर सर्रास मोबाईलवर बोलताना पाहायला मिळाले. 

हेही वाचा :  'आपके आ जाने से' गाण्यावर नाचत होती शिक्षिका, अधिकाऱ्यांनी पाठवले थेट घरी... Video Viral

कारवाई होणार का?

आता याप्रकरणी हिरामण गवळी यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. गवळी यांना एक नियम आणि अन्य लोकांना दुसरा नियम आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येत मतदार बाहेर पडावे, यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भाजप पदाधिकारी हिरामण गवळी यांचं हे वागणं योग्य आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आता हिरामण गवळी यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

सरासरी 15.93 टक्के मतदानाची नोंद

दरम्यान राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानात सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. यात धुळे- 17.38 टक्के,  दिंडोरी- 19.50 टक्के, नाशिक – 16.30 टक्के, पालघर-   18.60 टक्के, भिवंडी-  14.89 टक्के, कल्याण  –  11.46  टक्के, ठाणे –   14.86 टक्के,  मुंबई उत्तर – 14.71 टक्के, मुंबई उत्तर – पश्चिम –   17.53 टक्के, मुंबई उत्तर – पूर्व –   17.01 टक्के,
मुंबई उत्तर – मध्य – 15.73 टक्के, मुंबई दक्षिण – मध्य- 16.69 टक्के, मुंबई दक्षिण – 12.75 टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा :  7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …