Video : ‘…तर त्यांना चप्पलने मारा’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : अधिकारी पैसे घेत असेल तर चप्पलने मारा बघू काय होतं असा सल्ला बीडच्या (Beed News) एका आमदारांनी नागरिकांना दिला आहे. मी आता जर एक पत्र दिलं तर तुमची वाट लागेल असा इशारा देखील या आमदाराने दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे (Mla Balasaheb Ajabe) यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी (independence day 2023) एका बैठकीत बोलताना बाळासाहेब आजबे यांनी हा इशारा दिला आहे. यासोबतच सरकारी योजनांमध्ये पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आजबे यांनी चांगलेच झापलं आहे.

अधिकारी पैसे घेत असेल तर चपले ने मारा.. बघू काय होतं ते असा सल्ला बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्तेतील आमदार आहेत. 15 ऑगस्ट रोजी आयोजित आढावा बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांनी अधिकारी कामासाठी पैसे मागतात अशी तक्रार केली होती. यावर बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी जो अधिकारी कर्मचारी पैसा मागेल त्याला तिथेच चपलेने मारा असा अजब सल्ला दिला आहे. त्यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :  पन्नास हजारांसाठी गमावला लाखमोलाचा जीव... इंजिनियर तरुणाने थेट तलावात मारली उडी

बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी व तालुक्यातील अधिकारी जर शेतकऱ्यांकडून पैसे घेत असतील तर चप्पल तेथेच मारा असे म्हटलं होतं. 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय आष्टी येथे वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली यावेळी शेतकऱ्यांनी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागतात अशी तक्रार केली होती. त्यावेळी आमदार आजबे यांनी उपस्थित नागरिकांसमोरच संबधित अधिकाऱ्यांना झापले. मी आता एक पत्र दिलं तर तुमची वाट लागेल असेही आजबे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे तर रेट कार्ड ठरवा असेही आजबे म्हणाले.

काय म्हणाले बाळासाहेब आजबे?

“मी कधीच दबाव टाकून काम करत नाही. योजना आपण आपल्या बापाच्या घरून देतो का? योजनेसाठी आपल्या घरून पैसे देतो का? शासनाच्या योजनांमध्ये जो व्यवहार चालला आहे त्याच्यामध्ये फरकच नसेल पडत तर तुम्हाला नीट करायला किती वेळ लागेल? तुम्हाला वाटतं आम्ही फक्त बोलतो काही करत नाही. आम्हाला फक्त तुमच्या अन्नात माती कालवायची नाही. मी आता जर एक पत्र दिलं तर तुमची वाट लागेल. तुम्ही म्हणताय पुरावे द्या. पुराव्यासाठी दहा माणसे उभी करु का? अजूनही संधी गेलेली नाही साहेब तुम्ही सुधरा. ऑपरेटर लोकसुद्धा गैरप्रकार करत आहेत. लोकं तळतळयाला लागले आहेत. घरकुलासाठी पैसे मागत असले तर चपलीने मारलं पाहिजे या मताचा मी आहे. इथून पुढे जो पैसे मागेल त्याला मारा या मताचा मी आहे. याच्यामध्ये 100 टक्के चुकी तुमची आहे,” असे बाळासाहेब आजबे म्हणाले.

दरम्यान, आमदार बाळासाहेब आजबे यांची खरी ओळख ही शांत व्यक्ती अशी आहे. ते अनेकदा आक्रमक होत नाहीत. मात्र मागील काही महिन्यांपासून कामच होत नसल्यामुळे ते अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार असूनही काम होत नसतील लोक अनेक वेळा चकरा मारूनही त्याच तक्रारी करत असतील आणि  त्या सोडवता येत नसेल तर लोकांना काय उत्तर द्यायची अशा अवस्थेत आजबे सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी चक्क चपलांनी मारण्याचाच अजब सल्ला देऊन टाकला आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे

हेही वाचा :  Viral Video: तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …